हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आल्याची आणखी एक घटना अमेरिकत उघडकीस आली आहे. अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील एका हिंदू मंदिराची तोडफोड आणि भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर रेखाटून समाजकंटकांनी विटंबना केली. मंदिराच्या प्रवेशद्वारावर काही आक्षेपार्ह प्रतिमा चितारण्यात आल्याचे आढळून आले. उत्तर टेक्सासमधील ओल्ड लेक भागामधील या मंदिराच्या द्वारावर क्रॉसची उलटी प्रतिमा आणि ६६६ हा आकडा रेखाटण्यात आला आहे.
मंदिराच्या भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर रेखाटण्यात आल्याचा प्रकार मंदिराच्या कार्यकारी मंडळाचे सभासद कृष्ण सिंह यांना आढळून आला. हा प्रकार येथील हिंदू समुदायासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले. स्थानिक पोलिसांनी दोषींचा तपास सुरू केला असून मंदिराभोवती आता संरक्षक भिंत देखील उभारण्यात आली आहे. या प्रकरामुळे व्यथित झालेल्या येथील हिंदू लोकांना मंदिराच्या स्वच्छतेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी अन्य धर्मीयांनीही पुढाकार घेतला आहे.
याआधी अमेरिकेत अशाच प्रकरे हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या होत्या. वॉशिंग्टनमध्ये १५ फेब्रुवारी आणि २६ फेब्रुवारी रोजी दोन हिंदु मंदिरांची समाजकंटकांनी तोडफोड केल्याचे आढळले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा