अमेरिकेची गूप्तहेर आणि तपास यंत्रणा फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) ने भारतीय विद्यार्थीनीची माहिती देणाऱ्यास १० हजार डॉलर्सचे (तब्बल ८ लाख ३२ हजार ४७१) बक्षीस जाहीर केले आहे. २९ वर्षीय विद्यार्थीनी मयुशी भगत ही चार वर्षांपूर्वी न्यू जर्सीमधून बेपत्ता झाली होती. २९ एप्रिल २०१९ साली न्यू जर्सीच्या अपार्टमेंटमधून तिला बाहेर जाताना शेवटचं पाहिलं गेलं होतं. काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि रंगीत पायजामा घालून ती घराबाहेर पडली होती. त्यानंतर तिचा कोणताच थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे १ मे २०१९ रोजी मयुशीच्या कुटुंबियांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

नेवार्क शहरातील एफबीआय कार्यालय आणि न्यू जर्सी शहर पोलिस विभागाने मयुशीचा शोध घेण्यासाठी आता लोकांची मदत मागितली आहे. यासाठी एफबीआयने मयुशीची माहिती देणाऱ्यास १० हजार डॉलर्सचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. मागच्या वर्षी जुलै महिन्यात एफबीआयने मुयीशीचे नाव बेपत्ता लोकांच्या यादीत टाकले आणि तिच्याबद्दल लोकांकडून माहिती मिळतेय का? याची चाचपणी केली.

Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
student could not bear stress of studying she became depressed and left home
मुलं मुली असे का वागतात? नैराश्य, अभ्यासाचा ताण, चिंता, घर सोडणे…
supreme court ask government for treatment of bedridden youth
तरुणाच्या कुटुंबीयांसाठी सर्वोच्च न्यायालय मदतीला; अकरा वर्षांपासून अंथरुणाशी खिळलेल्या तरुणावर आता सरकारी उपचार
Today is the last day to apply for various courses of Idol Mumbai print news
‘आयडॉल’च्या विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
indians want to move abroad indians want opportunity to leave India
भारतीयांना भारत सोडण्याची संधी का हवी असते?
Shrigonda Vidhan Sabha Constituency, Pratibha Pachpute,
मुलासाठी आईची माघार.. भाजपचा एबी फॉर्म आईने दिला मुलाला

हे वाचा >> पाच वर्षांत ४०३ भारतीय विद्यार्थ्यांचा परदेशात मृत्यू; ‘या’ देशात सर्वाधिक विद्यार्थी मृत्यूमुखी

जुलै १९९४ साली जन्मलेली मयुशी अमेरिकेत स्टुडंट व्हिसावर गेली होती. न्यू यॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ती शिक्षण घेत होती. एफबीआयच्या माहितीनुसार, मयुशीला इंग्रजी, हिंदी आणि ऊर्दू भाषा बोलता येत होत्या. तसेच दक्षिण प्लेनफिल्ड आणि न्यू जर्सीमध्ये तिचे बरेच मित्र होते. एफबीआयच्या नेवार्क कार्यालयाने सांगितले की, मयुशी भगतच्या ठिकाणाबद्दल किंवा तिच्या बेपत्ता होण्याबद्दल कोणीही माहिती असल्यास पोलिसांना द्यावी. जे लोक मयुशीची माहिती देतील किंवा तिला शोधण्यात मदत करतील, त्यांना बक्षीस म्हणून १० हजार डॉलर्स देण्यात येतील, असे एफबीआयने जाहीर केले आहे.

आणखी वाचा >> विश्लेषण: भारतीय विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती कॅनडाला… काय आहेत कारणे?

न्यू जर्सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुशीची उंची ५.१० फूट असून काळे केस आणि डोळ्याचा रंग तपकीरी आहे. २०१६ साली मयुशी एफ१ स्टुडंट व्हिसावर अमेरिकेत आली होती. एफबीआयने त्यांच्या संकेतस्थळावरील अपहरण, बेपत्ता लोकांच्या यादीत मयुशीचे नाव समाविष्ट केले असून शहरात विविध ठिकाणी तिच्या फोटोचे पत्रक लावले आहेत.