पीटीआय, इंफाळ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात संशयित अतिरेक्यांनी दोन पोलीस चौक्या, वन विभागाचे एक कार्यालय आणि किमान ७० घरे जाळली आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. अतिरेक्यांच्या या हल्ल्यानंतर तणाव वाढला असून पोलीस अधीक्षकांवर बदलीची कारवाई करण्यात आली. संशयित अतिरेक्यांनी ५९ वर्षीय व्यक्तीची हत्या केल्यानंतर गुरुवारी सायंकाळपासून जिरीबाममध्ये हिंसाचार सुरू आहे.

अतिरेक्यांविरोधातील कारवाईत सुरक्षा कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी ७० हून अधिक राज्य पोलिसांची तुकडी इंफाळहून जिरीबामला विमानाने पाठवण्यात आली होती. मात्र अतिरेक्यांनी शनिवारी पोलीस चौक्या, घरे यांना लक्ष्य केले. अतिरेक्यांनी लामताई खुनौ, दिबोंग खुनौ, ननखल आणि बेगरा या गावांतील ७० हून अधिक घरे जाळली. दरम्यान, शुक्रवारी जिरीबामच्या परिघीय भागातून सुमारे २३९ मेईतेई नागरिकांना बाहेर काढण्यात आले. त्यांना जिल्ह्यातील एका बहु-क्रीडा संकुलात नव्याने उभारलेल्या मदत शिबिरात हलविण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड; मल्लिकार्जून खरगेंचा प्रस्ताव एकमताने मंजूर!

संशयित अतिरेक्यांनी ५९ वर्षीय व्यक्तीची हत्या केल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी जिरीबाममध्ये हिंसाचार उसळला. सोइबाम सरतकुमार सिंह असे या व्यक्तीचे नाव असून, ते ६ जून रोजी शेतात गेल्यानंतर बेपत्ता झाले होते. नंतर त्यांचा मृतदेह सापडल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर स्थानिकांनी पडक्या इमारतींना आग लावल्यानंतर तेथे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले.

एम. प्रदिप सिंग नवे अधीक्ष

राज्य सरकारने जिरीबमचे पोलीस अधीक्षक ए. घनश्याम शर्मा यांची मणिपूर पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाच्या अतिरिक्त संचालकपदी बदली केली. तर पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाचे अतिरिक्त संचालक म्हणून कार्यरत असलेले एम. प्रदिप सिंग जिरीबाम जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tension again in manipur police posts targeted by militants amy