Bangladesh Protest: बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलक वंग भवनावर चाल करून आले आहेत. बांगलादेशमध्ये शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या भेदभावाच्या विरोधात विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. या संघटनांनी नंतर पंतप्रधान शेख हसीना यांच्या घरावर चाल केली आणि त्यांना देशाबाहेर जाण्यास भाग पाडले. याच संघटना आता राष्ट्रपतींच्या विरोधात आक्रमक झाल्या असून ढाकामधील राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढण्यात आला आहे. आंदोलकांनी पाच मागण्या केल्या असून राष्ट्रपतींनी राजीनामा द्यावा, अशी एक मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आंदोलकांनी मंगळवारी रात्री वंग भवनाकडे मोर्चा नेल्यानंतर लष्कराने तटबंदी उभारून मोर्चेकऱ्यांना अडवले. यानंतर आंदोलक एकत्र येऊन घोषणाबाजी करू लागले. यामध्ये राष्ट्रपतींनी राजीनामा द्यावा, अशाही घोषणा होत्या. राष्ट्रपती हे हसिना सरकारच्या जवळचे होते. त्यामुळे त्यांनी तात्काळ पदावरून पायउतार व्हावे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

मोहम्मद शहाबुद्दीन हे बांगलादेशचे १६ वे राष्ट्रपती आहेत. २०२३ साली राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अवामी लिग पक्षाकडून त्यांचे नाव पुढे करण्यात आले आणि त्यांची बिनविरोध निवड झाली. भेदभाव विरोधी विद्यार्थी आंदोलनाने १९७२ साली लिहिलेले संविधान बदलून नवी घटना लिहिली जावी, असा आग्रह धरला आहे. याबरोबरच अवामी लिगच्या बांगलादेश छात्र लीग या संघटनेवर बंदी आणावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली २०१४, २०१८ आणि २०२४ साली झालेल्या निवडणुका अवैध असून या निवडणुकांतून निवडून आलेल्या खासदारांना तात्काळ अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

हे वाचा >> बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांनंतर हिंदू महासभा आक्रमक; ग्वाल्हेरमधील भारत-बांगलादेश सामन्याच्या दिवशी पाळणार ‘बंद’

जुलै महिन्यात बांगलादेशमध्ये विद्यार्थी चळवळीने उग्र रुप धारण घेतले. सरकारी नोकरीमध्ये असलेल्या राखीव जागा काढून टाकण्यात याव्यात, अशी मागमी विद्यार्थ्यांनी केली होती. या आंदोलनानंतर ७६ वर्षीय शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि ५ ऑगस्ट रोजी बांगलादेशमधून काढता पाय घेतला आणि भारतात आश्रय घेतला. यानंतर ८ ऑगस्ट रोजी नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थान झाले.