Pakistan Ex PM Imran Khan Arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद न्यायालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली. इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या प्रकरणी न्यायालयात हजर राहिल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. यापूर्वी मार्चमध्येच इम्रान खान यांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलीस प्रशासनाला यश आलं नव्हतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज मंगळवारी इम्रान खान इस्लामाबाद न्यायालयात सुनावणीसाठी हजर झाले होते. यावेळी पाकिस्तानी रेंजर्संच्या तुकडीने त्यांना अटक केली. त्यांना अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत अटक करण्यात आली.

इम्रान खान यांच्या अटकेचे पडसाद पाकिस्तानमध्ये उमटायला सुरुवात झाली आहे. इम्रान खान यांच्या समर्थकांनी पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला चढवला आहे. तसेच मुख्यालय परिसरात जाळपोळही केली आहे. इम्रान खान यांच्या समर्थकांच्या आक्रोशाचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. ज्यामध्ये संतप्त कार्यकर्ते जाळपोळ करताना दिसत आहेत.

हेही वाचा- “माझा दोनदा हत्येचा प्रयत्न झाला”; अटकेआधी इम्रान खानची प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल

इम्रान खानच्या समर्थकांनी लष्कराच्या मुख्यालयात घुसण्यापूर्वी आतमध्ये दगडफेक केली. लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला होण्याची ही पहिलीच घटना आहे. दुसरीकडे, आयएसआय मुख्यालयाबाहेर निदर्शने करत असताना दोन जणांना गोळ्या घातल्याचा दावा एका आंदोलकाने केला. शिवाय आंदोलकांनी मियांवली हवाई तळाबाहेर ठेवलेल्या एका डमी विमानाला आग लावली आहे. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.