एका चिनी महिलेच्या १० हजार अमेरिकी डॉलरच्या बचतीच्या पैशांवर वेगळ्याच दरोडेखोरांनी डल्ला मारला; ही टोळी होती ती वाळवीची.
दक्षिण चीनमधील ग्वांगडाँग प्रांतात शुंडे येथे या महिलेला तिच्या मुलांनी चार लाख युआन इतकी रक्कम दिली होती. तिने ती रक्कम बँकेत किंवा कॅशबॉक्समध्ये ठेवण्याच्या ऐवजी प्लास्टिकच्या पिशवीत भरून तिच्या घरातील पहिल्या मजल्यावर असलेल्या लाकडी खणात ठेवली. एप्रिलपर्यंत तिने या रकमेकडे बघितलेही नाही, नंतर तिने खण उघडला असता या नोटा वाळवीने खाल्ल्याचे दिसून आले. वाळवीमुळे सर्व नोटा खराब झाल्या. नंतर बँक अधिकाऱ्यांनी उरलेल्या काही नोटांचे स्कॅनिंग केले तेव्हा ३ लाख ३४ हजार युआन म्हणजे ५५,४५४ डॉलर ओळखले गेले, तर ६० हजार युआन म्हणजे ९७८६ अमेरिकी डॉलर हे वाया गेले.

Story img Loader