नवी दिल्ली :  पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे प्रमाण कमी झालेले नसून, मुंबईवरील २६-११च्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यात त्या देशाने अद्याप प्रामाणिकपणा दाखवलेला नाही, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सोमवारी एका अहवालात सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताची बदनामी करण्यासाठी, तसेच आपल्या देशांतर्गत राजकीय व आर्थिक अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानचा ‘शत्रुत्वपूर्ण आणि काल्पनिक प्रचार’ अजूनही सुरूच आहे, असे २०२२ सालासाठीच्या वार्षिक अहवालात मंत्रालयाने म्हटले आहे. पाकिस्तानसोबत सामान्य शेजाऱ्यासारखे संबंध असावे अशी भारताची इच्छा आहे आणि कुठलेही मुद्दे असतील तर ते दोन्ही बाजूंनी व शांततेने, तसेच दहशत व हिंसा यांपासून मुक्त वातावरणात सोडवले जावेत अशी भारताची कायम भूमिका राहिलेली आहे. याचवेळी, अशाप्रकारचे पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे, असेही भारताने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानचा ‘शत्रुत्वपूर्ण आणि काल्पनिक प्रचार’ अजूनही सुरूच आहे. भारतासाठी पूर्णपणे देशांतर्गत असलेल्या मुद्दय़ावर पाकिस्तानच्या सर्व कृती आणि वक्तव्ये भारताने पूर्णपणे नाकारली असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrorism activities continue sponsored by pakistan foreign affairs department report zws