जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांपूर्वी रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. दहशतवाद्यांनी भाविकांच्या एका बसवर हल्ला केला होता. यानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला होता, तर ३३ जण जखमी झाले होते. आता ही घटना ताजी असतानाच दहशतवाद्यांनी आणखी एका ठिकाणी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तात्पुरत्या परिचालन तळावर (टीओबी) दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. या चकमकीत भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्तुरात १ दहशतवादी ठार झाला आहे. तर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. यासंदर्भातील माहिती जम्मू काश्मीरच्या पोलिसांकडून रात्री उशीरा देण्यात आली.
#WATCH | Jammu and Kashmir: Follow-up search operation underway after the terror attack in Kathua's Hiranagar last night.
— ANI (@ANI) June 12, 2024
Out of two terrorists, one was neutralised last night in an encounter. Search operations to nab the other terrorists are underway. The security forces have… pic.twitter.com/uMD7CfRKWD
हेही वाचा : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; एक सुरक्षा रक्षक जखमी
गेल्या तीन दिवसांमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्यामुळे आता जम्मू काश्मीरसह सीमांवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबरोबरोच आंतरराष्ट्रीय सीमा, महामार्ग आणि पंजाब आणि हिमाचलच्या सीमेवरील चौक्यांवरही विशेष नजर ठेवण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तात्पुरत्या परिचालन तळावर (टीओबी) दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये ३ जवान जखमी झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तर अद्यापही डोडामध्ये चकमक सुरू असून काही ठिकाणी दहशतवादी लपल्याचा संशय लष्कराला असून त्या पार्श्वभूमीवर शोधमोहिम सुरु आहे.
#WATCH | Jammu and Kashmir: Search operation underway in Bhaderwah, Doda as an encounter is underway between security forces and terrorists in Chattargala area of Doda.
— ANI (@ANI) June 12, 2024
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/AyaBVYQDXR
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांच्या बसवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. त्यांनी दिलेल्या संदेशात पर्यटक आणि गैरस्थानिकांना अशा प्रकारच्या हल्ल्यांचा इशारा दिला आहे. TRF ला २०२३ साली भारत सरकारने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये या संघटनेचा सहभाग आहे. या घटनेनंतर आता या भागात सुरक्षा अधिक बळकट करण्यात आली आहे. तसेच दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.