जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले. तर अन्य तीन जवान जखमी झाल्याचं वृत्त ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेनं दिलं आहे. हल्ला झालेल्या वाहनांमध्ये ट्रक आणि जिप्सीचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, संबंधित वाहने बुफलियाजजवळील भागातून जवानांची वाहतूक करत होती, जिथे बुधवारी रात्रीपासून दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. ही कारवाई डीकेजी (डेरा की गली), थानामंडी, राजौरी परिसरात केली जात आहे.

दरम्यान, आज दुपारी पावणे चारच्या सुमारास राजौरी-ठाणामंडी-सुरनकोट मार्गावरील सावनी परिसरात हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी ताफ्यावर गोळीबार केला. या हल्यात तीन जवान शहीद झाले तर अन्य तीन जवान जखमी झाले. दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा रवाना करण्यात आला आहे.

संरक्षण दलाच्या पीआरओने ‘पीटीआय’ला दिलेल्या माहितीनुसार, “भारतीय सैन्यांनी काल (२० डिसेंबर) रात्री एक संयुक्त ऑपरेशन सुरू केलं होतं. आज संध्याकाळी संपर्क प्रस्थापित झाला असून चकमक सुरू आहे.”