दहशतवादी हल्ल्यांच्या भीतीमुळे शाळा बंद ठेवल्याने दहशतवाद्यांचे मनोधैर्य वाढते, अशी टीका पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्र्यांनी पंजाब प्रांतातील पीएमएल-एन पक्षाच्या सरकारवरच केली आहे.
शाळा सुरू असताना सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करता येते. भीती आणि दहशतवादाच्या वातावरणाविरोधात आम्ही एकजुटीने लढणार असल्याचा संदेश आपण दिला पाहिजे, असे निसार अली खान यांनी म्हटले आहे.
पंजाब सरकारने कडाक्याच्या थंडीचे कारण देऊन शाळा एक आठवडय़ासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, मात्र दहशतवादी हल्ल्यांच्या भीतीने सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडले आहे, असे माध्यमांनी सूचित केले. दहशतवादी आता हताश झाले असल्याने सहज लक्ष्य करण्यात येणाऱ्या ठिकाणांकडे त्यांचे लक्ष आहे.
हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानात शाळा बंद
दहशतवादी हल्ल्यांच्या भीतीमुळे शाळा बंद ठेवल्याने दहशतवाद्यांचे मनोधैर्य वाढते
First published on: 29-01-2016 at 00:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrorist attack on pakistan school