आंध्रप्रदेशात एका घरात आज शनिवार सकाळी घुसलेल्या दोन दहशतवाद्यांना आंध्र आणि तमिळनाडू पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. या दोघांनाही जखमी अवस्थेत अटक करण्यात आली आहे. तसेच दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक पोलिस निरीक्षक झाले असून दोन पोलिस जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्रमधील चित्तूर जिल्ह्यातील पुत्तूर गावात एका घरात हे दहशतवादी घुसले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शोध मोहिम सुरु केल्यानंतर एका घरात दोन दहशतवादी लपले अससल्याचे समोर आले. पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. सुरक्षा रक्षकांनी घराला घेरले. पोलिसांच्या मदतीला आंध्रप्रदेशचे दहशतवादी विरोधी पथकही त्वरित घटनास्थळी दाखल झाले व घरावर हल्ला केला. यात हे दोनही दहशतवादी जखमी झाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
या दोघांची बिलाल इस्माइल आणि पन्ना मलिक अशी नावे असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
यात दोन पोलीस जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच पालिसांनी तमिळनाडूच्या सीमेवर एका दहशतवाद्याला अटक केली आहे. फकरुद्दीन असे या अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. फकरुद्दीनच्याच नेतृत्वाखाली चित्तूर जिल्ह्यात दहशतवादी घुसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांमार्फत चित्तूर जिल्ह्यात छापा टाकला गेला.
केरनमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान
दहशतवाद्यांचे हल्लासत्र सुरूच