* जम्मू पोलीस दलातील एनकाउंटर
* स्पेशालिस्ट उपनिरीक्षकाला अटक
जम्मू-काश्मीरमधील एनकाउंटर स्पेशालिस्ट असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला दहशतवाद्यांचा अड्डा चालवित असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. दोडा-किश्तवार पट्टय़ात ६८ दहशतवाद्यांना ठार मारण्यात त्याचा मोठा वाटा होता. शिवकुमार असे या अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्याला राष्ट्रपतींचा शौर्य पुरस्कार मिळालेला आहे. राज्याचे गृहमंत्री सज्जाद अहमद किचलू यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून पोलीस उपनिरीक्षकाची चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे.
शर्मा हा जम्मू-काश्मीर पोलीस दलाच्या सेवेत होता व किश्तवार जिल्ह्य़ात दहशतवाद्यांचा अड्डा चालवित होता. गेल्या महिन्यात थाथरी पोलीस ठाण्यावर झालेल्या बॉम्बहल्ल्यात त्याच्या या मोडय़ुलचे दहशतवादी सामील होते. हा पोलीस उपनिरीक्षक रॉबिनहूड नावाने ओळखला जात होता व त्याने दोडा-किश्तवार पट्टय़ात ६८ दहशतवाद्यांना ठार केले होते. राष्ट्रपतींच्या शौर्य पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्याला मिळाले होते. शर्मा यानेच आपल्याला शस्त्रास्त्रे व स्फोटके पुरवली अशी माहिती थाथरी पोलीस ठाणे हल्ल्यात पकडलेल्या पाच जणांनी दिली होती. त्यानंतर त्याचा दहशतवादी कारवायातील सहभाग उघड झाला होता.
डोंगराळ भागात काही राजकीय नेत्यांची हत्या करण्याचा कटही या दहशतवाद्यांनी आखला होता अशी माहिती तपासात मिळाली होती. २३ मे रोजी या दहशतवाद्यांना शस्त्रे व दारूगोळ्यासह अटक झाली होती. थाथरी पोलिस स्टेशनवरील हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांनी हातबॉम्ब टाकून पोलीस अधिकाऱ्यांना ठार मारण्याचा कट आखला होता, पण हा बॉम्ब पोलीस टाण्याच्या अलीकडेच पडला. शर्मा हा उपनिरीक्षक विशेष पोलीस अधिकारी म्हणून भरती झाला. त्याला दोन बढत्याही मिळाल्या होत्या, किश्तवार जिल्ह्य़ात विशेष कामगिरी दलात त्याची नेमणूक होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा