जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी एका विशेष पोलीस अधिकाऱ्याच्या घरात घुसून त्याची हत्या केली. दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेले पोलीस अधिकारी मुश्ताक अहमद यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
या हल्ल्यात मुश्ताक अहमद यांची पत्नी जखमी झाली आहे. त्यांना बीजबेहरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. यापूर्वी सुद्धा काश्मीरमध्ये सैन्य दलामध्ये असणाऱ्या काश्मिरी जवानांच्या अशाच प्रकारे हत्या करण्यात आल्या आहेत.
#UPDATE: Special Police Officer Mushtaq Ahmed Sheikh succumbs to injuries on way to hospital. He was fired upon by terrorists at his house in Bijbehara. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) March 29, 2018