Warning of Possible Terrorists Attack during Muharamul Haram : पाकिस्तानमध्ये मोहरमूल हरामदरम्यान दहशतवादी हल्ला (Terrorists Attack in Pakistan) होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, याबाबत एआरवायच्या अहवालानुसार हिंदूस्तान टाइम्सने वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कराचीचे पोलीस उप अधीक्षक, तारिक इस्लाम यांनी अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. अतिक्रमण विरोधी पोलीस कर्मचाऱ्यांना अलीकडील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मोहरमूल हराम दरम्यान कर्तव्यावर एकटे न जाण्याचंही आवाहन केलं आहे. मोहरम दरम्यान कराचीमध्ये सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जाऊ शकते, असा इशाराही या अधिसूचनेत देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांना अधिकृत असाइनमेंटसाठी पोलीस व्हॅनचा वापर करण्याचे आणि ड्युटी संपवून घरी परतताना गणवेश आणि बूट घालणे टाळण्याचे निर्देश देण्यात आले होते.

पाकिस्तानात सशस्त्र दल तैनात

सिंध, बलुचिस्तान, खैबर-पख्तुनख्वा, इस्लामाबादमधील अधिकाऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सैन्य तैनात करण्याची विनंती केली होती. त्यानुसार, सोमवारी सरकारने मोहरम महिन्यात सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी देशभरात सशस्त्र दल तैनात करण्यास मान्यता दिली.

हेही वाचा >> संयुक्त राष्ट्रानं पाकिस्तानला खडसावलं; म्हणाले, “इम्रान खान यांची अटक म्हणजे एका मोठ्या कारस्थानाचा भाग”!

पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने स्पष्ट केले की सैन्याची तैनात करण्यासाठी ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत. तत्पूर्वी, पाकिस्तानच्या पंजाब सरकारने मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान ६ ते ११ जुलै दरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही नियंत्रण ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे.

पाकिस्तानात ५०२ ठिकाणं संवेदनशील क्षेत्र

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इस्लामिक रिपब्लिकच्या विविध क्षेत्रांमध्ये सध्या कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पंजाबमधील ५०२ ठिकाणे ‘संवेदनशील क्षेत्र’ म्हणून निवडली गेली आहेत. ज्यामुळे सैन्य आणि रेंजर्सचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शिया मुस्लिमांमध्ये मोहरमला खूप महत्त्व आहे. परंतु, या काळात सुन्नी आणि शिया समुदायांमध्ये पाकिस्तानला वारंवार सांप्रदायिक हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे.

हेही वाचा >> “पाकिस्तानात धार्मिक अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत, मुस्लिमांचे लहान पंथ…”; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची कबुली!

पाकिस्तानात अल्पसंख्यांना धर्माच्या नावार लक्ष्य

“पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना धर्माच्या नावावर लक्ष्य केलं जात आहे आणि त्यांचं संरक्षण करण्यास देश अपयशी ठरला आहे”, अशी कबुली पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. “अल्पसंख्याकांची दररोज हत्या केली जात आहे. पाकिस्तानमध्ये कोणताही धार्मिक अल्पसंख्याक सुरक्षित नाही. मुस्लिमांचे लहान पंथही सुरक्षित नाहीत”, असं ख्वाजा आसिफ म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrorists attack in pakistan dont walk alone advice to police in pakistan gk