जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात चार जवान शहीद झाले असून चार जण जमखी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे अद्यापही लष्काराचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, कठुआ जिल्ह्यातील मच्छेडी भागात हा हल्ला झाला आहे. लष्कराचे पथक या भागातून जात असताना एका टेकडीवर लपलेल्या दहशतवाद्यांनी अचानक लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार सुरु केला. तसेच हातगोळेही फेकले. या हल्ल्याला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत चार जवान शहीद झाले, तर चार जवान जखमी झाले. जखमी जवानांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. रविवारी राजौरी भागातही दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यालाही लष्कराने चोख प्रत्यु्त्तर दिले होतं. मात्र, दशहतवाही येथून पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला होता. याशिवाय गेल्या महिन्यात ११ आणि १२ जून रोजीही दहशतवाद्यांनी अशाप्रकारेच लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यांत सहा लष्कराचे जवान आणि एक स्थानिक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrorists attack on army vehicle in jammu kashmirs kathua district four jawans killed spb
Show comments