Tesla Begins Hiring In India : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसीय अमेरिका दौऱ्यात टेस्लाचे संस्थापन एलॉन मस्क यांची भेट घेतली. या भेटीनंतर भारतातील तरुणांसाठी सुवर्णसंधी निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, आता टेस्ला कंपनी भारतात नोकरभरती करण्याच्या विचारात आहे. यासंदर्भात त्यांनी लिंक्डइन पेजवर जाहीरात केली आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबई आणि दिल्लीतील तरुणांना टेस्लामध्ये काम करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.

टेस्ला मुंबईत कोणत्या पदासाठी भरणार जागा?

लिंक्डइन पेजवरील जाहिरातीनुसार कस्टमर सर्व्हिस आणि बॅकएंड कामांसाठी ते १३ पदे भरणार आहेत. तसंच, सेवा तंत्रज्ञ आणि विविध सल्लागार भूमिकांसह किमान पाच पदे मुंबई आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणांहून भरण्यात येणार आहेत. तर उर्वरित पदे, जसे की कस्टमर एंगेजमेंट मॅनेजर (customer engagement manager) आणि वितरण ऑपरेशन्स विशेषज्ञ (delivery operations specialist) मुंबईतून भरण्यात येणार आहेत.

भारताने कारवरील शुल्क कमी केल्यामुळे…

टेस्ला आणि भारत गेल्या अनेक वर्षांपासून सतत एकमेकांशी संवाद साधत आहेत, परंतु उच्च आयात शुल्कामुळे कार निर्माता कंपनी दक्षिण आशियाई राष्ट्रापासून दूर राहिली होती. भारताने आता ४० हजार डॉलरपेक्षा जास्त किमतीच्या उच्च दर्जाच्या कारवरील मूलभूत सीमा शुल्क ११० टक्के वरून ७० टक्क्यांपर्यंत कमी केले आहे.

चीनच्या तुलनेत भारतातील ईव्ही बाजारपेठ अजूनही नवीन आहे. तसंच, ईव्ही विक्रीत पहिली वार्षिक घट नोंदवण्यात आल्याने त्यांनी अधिक बाजारपेठांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी भारतातील इलेक्ट्रिक कारची विक्री चीनच्या १.१ कोटी युनिट्सच्या तुलनेत १००,००० युनिट्सच्या जवळ पोहोचली.

मोदींचा अमेरिका दौरा सत्करणी

गेल्या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान मोदी आणि मस्क यांच्यात झालेल्या बैठकीनंतर टेस्लाचा भारताकडे येण्याचा हेतू आहे. ट्रम्प यांनी नंतर सांगितले की पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या व्यापार तूट वाढवून अमेरिकन लष्करी खरेदीसाठी वाटाघाटी सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे, ज्यामध्ये शेवटी F-35 लढाऊ विमानांचा पुरवठा करण्याचे पाऊल समाविष्ट आहे.

एलॉन मस्क हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे सदस्य असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली भेट व्यावसायिक होती की राजकीय हे अस्पष्ट आहे. यामुळे मस्क यांची राजकीय आणि व्यावसायिक भूमिका अस्पष्ट आहे. गेल्या महिन्यात, इटलीने सुरक्षित दूरसंचारासाठी मस्क यांच्या स्पेसएक्सशी चर्चा झाली होती. इटलीच्या पंतपर्धान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी भेट झाल्यानंतर ही चर्चा झाली होती.

Story img Loader