Elon Musk : इलेक्ट्रिक वाहन उत्पादनात अग्रेसर असलेल्या टेस्ला कंपनीचे संस्थापक आणि सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) हे आपल्या अनेक निर्णयांमुळे कायम चर्चेत असतात. इलॉन मस्क यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखलं जातं. इलॉन मस्क हे कधी मुलांच्या सोशल मीडियाच्या वापराबद्दल बोलतात, तर कधी अजून दुसऱ्या कोणत्या विषयांवर बोलतात. त्यामुळे इलॉन मस्क हे नेहमी कोणत्या न कोणत्या विषयांवरून चर्चेत असतात.

आता इलॉन मस्क यांच्या एका विधानाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. इलेक्ट्रिशियन आणि प्लंबरसंदर्भात इलॉन मस्क यांनी एक विधान केलं आहे. राज्यशास्त्राच्या पंडितांपेक्षा इलेक्ट्रिशियन्स व प्लंबर्स अधिक मोलाचे असल्याचं इलॉन मस्क यांनी म्हटलं आहे. तसेच यशस्वी होण्यासाठी आपण चार वर्ष महाविद्यालयात शिक्षण घेतलं पाहिजे हा विचार मनात नसावा, असंही असं इलॉन मस्क यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ अनेकांनी एक्स या एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.

इलॉन मस्क यांनी काय म्हटलं?

“राज्यशास्त्राच्या पंडितांपेक्षा इलेक्ट्रिशियन्स आणि प्लंबर्स अधिक मोलाचे आहेत असं वाटतं. कारण जे हाताने काम करतात त्यांच्याबद्दल मला कायम आदर आहे. सध्याच्या काळात आम्हाला इलेक्ट्रिशियन, प्लंबर आणि सुतारांची गरज आहे. कारण हे खूप महत्त्वाचे आहे. तसेच यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे चार वर्ष महाविद्यालयात शिक्षण घेतलं पाहिजे किंवा ते आवश्यकच आहे, हा विचार आपल्या मनात नसला पाहिजे. कारण ते अजिबात खरं नाही”, असं इलॉन मस्क यांनी म्हटलं आहे.

Story img Loader