पीटीआय, बालासोर : भारताने शुक्रवारी ओडिशाच्या किनारपट्टीवर स्वदेशी बनावटीच्या मध्यम पल्ल्याचे ‘बॅलिस्टिक’ क्षेपणास्त्र ‘अग्नी प्राईम’ची यशस्वी चाचणी घेतली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) सूत्रांनी ही माहिती दिली. ए.पी.जे. अब्दुल कलाम बेटावरून सकाळी पावणे दहाला हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात आले. सूत्रांनी सांगितले, की घन इंधन असलेल्या या क्षेपणास्त्राने चाचणीदरम्यान सर्व निर्धारित मापदंड यशस्वीरीत्या पूर्ण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अधिकाऱ्यांनी सांगितले, की क्षेपणास्त्राच्या प्रवासादरम्यान ‘रडार’द्वारे सातत्याने निरीक्षण केले गेले. तसेच यासाठी विविध ठिकाणी दूरमापक उपकरणे बसवली होती. हे क्षेपणास्त्र एक ते दोन हजार किलोमीटपर्यंतच्या लक्ष्यावर मारा करू शकते. सूत्रांनी सांगितले, की या क्षेपणास्त्राची मागील चाचणी १८ डिसेंबर रोजी कलाम बेटावरूनच करण्यात आली होती. त्या वेळीही ती यशस्वी झाली होती.