वसईच्या श्रद्धा वालकर खून प्रकरणाने देशात खळबळ माजली आहे. या प्रकरणात रोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. खासदार संजय राऊत यांनी या खून प्रकरणातील मारेकऱ्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. “मारेकऱ्यावर खटले चालवू नका. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे त्याला भरचौकात फासावर लटकवा” असे राऊत यांनी म्हटले आहे. देशभरातील मुलींनी सावधपणे जगण्यास शिकलं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Shraddha Murder Case: भाड्याचे घर, फ्रिज, मृतदेहाचे तुकडे; श्रद्धा आणि आफताबच्या दिल्लीतील ‘त्या’ घराचे Inside Photos

“महाराष्ट्रातील मुलीची हत्या धक्कादायक आणि दुर्देवी आहे. समाजमाध्यमातून ओळखी होतात, त्यातून अशी भयंकर नाती निर्माण होतात. ही मुलं कोणत्या धुंदीत आणि गुंगीत जगत आहेत, हे आज परत एकदा कळलं आहे”, असे राऊत म्हणाले आहेत. “श्रद्धाचा खून विकृतीच्या पुढचं पाऊल आहे. या खून प्रकरणात राजकारण बंद केलं पाहिजे. यात राजकारण करणारे समाजाचे शत्रू आहेत”, अशी टीका त्यांनी केली आहे. पीडित मुलीच्या वडिलांचा, कुटुंबाचा आक्रोश समजून घेतला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पाहा व्हिडीओ –

Shraddha Murder Case: श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करताना आफताब झालेला जखमी? उपचार करणारे डॉक्टर म्हणाले, “तो मे महिन्यात…”

२६ वर्षीय श्रद्धाचा तिचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला (२८) याने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आरोपी आफताबला पोलिसांनी अटक केली आहे. ‘डेक्सटर’ नावाची वेब सीरिज पाहिल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना सुचल्याचे आरोपीने पोलीस तपासात सांगितले आहे.

Shraddha Murder Case: डेटिंग अ‍ॅपवरुन मैत्री ते Dexter बघून मृतदेहाचे ३५ तुकडे…हे प्रकरण ‘या’ हिंदी चित्रपटांची आठवण करून देईल

दिल्लीतील हे खून प्रकरण पाच महिन्यांनंतर जगासमोर आले आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेऊन तब्बल तीन आठवडे तो टप्प्याटप्प्याने त्याची विल्हेवाट लावत होता. अवयवांचे तुकडे मेहरोलीच्या जंगलात फेकल्याचे तपासात उघड झाल्यानंतर याठिकाणी पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group mp sanjay raut demanded to hang accused in shraddha walkar murder case rvs