भूकंपग्रस्त नेपाळला मदतीचा हात देण्यात तत्परता दाखविणाऱया भारताच्या राजनैतिक प्रयत्नांचे ट्विटरकरांनी कौतुक केले आहे. शनिवारी नेपाळमध्ये आलेल्या भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदतीची तत्परता दाखवल्याबाबत ट्विटरकरांनी त्यांचे आभार मानण्यासाठी #ThankYouPM हा हॅशटॅगने ट्विट्स करण्यास सुरूवात केली. यानंतर काही तासांतच हा हॅशटॅग ट्विटरच्या टॉप ट्रेंडमध्ये पहायला मिळाला. यानंतर मोदींनी याची दखल घेत ट्विटरकरांचे आभार मानले मात्र, खरे कौतुक तेथे मदतीचे कार्य करणाऱया जवान, डॉक्टर्स आणि स्वयंसेवकांचे मानयला हवेत, असे म्हटले आहे. तसेच मोठ्या धाडसाने नेपाळ भूकंपाचे वास्तव दाखवणाऱया माध्यमांचेही कौतुक मोदींनी केले आहे.
This amount of Rs. 4 lakh is in addition to the compensation of Rs. 2 lakh from the PMNRF to the next of kin of those who lost their lives.
— PMO India (@PMOIndia) April 26, 2015
To all those saying #ThankYouPM– appreciate the sentiment…real thanks should be to our great culture, which teaches us ‘Seva Parmo Dharma’.
— Narendra Modi (@narendramodi) April 27, 2015
If we want to thank anyone, it should be the 125 crore people of India who have made Nepal’s pain their own & extended all help.
— Narendra Modi (@narendramodi) April 27, 2015