पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ‘आधुनिकता आणि विकास’च्या प्रारुपातून जनमतातील त्यांच्याबद्दलच्या ‘द्वेष प्रतिमेला’ बदलून टाकले असल्याचे मत काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी व्यक्त केले. मोदींच्या आताच्या सर्वसमावेशक आणि जुळवून घेणाच्या वृत्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांनी स्वत:च्या प्रतिमेची विकास आणि आधुनिकेत्या माध्यमातून पुनर्बांधणी केली आहे तसेच भाजप पक्षाला हिंदू भक्तीच्या पगड्यातून बाहेर काढून शाश्वत विकासाचे शासन देणाऱया पक्षात रुपांतर करण्याची नरेंद्र मोदींची इच्छा दिसून येते, अशी स्तुतीसुमने शशी थरुर यांनी मोदींप्रती उधळली आहेत. त्याचबरोबर दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना थरूर म्हणाले की, “सर्वसमावेश आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची सध्याच्या सरकारची भाषा स्वागतार्ह आहे. आम्ही विरोधक असलो तरी, रागाच्या भरात त्यांच्या या भूमिकेवर दुर्लक्ष करण्याचे काहीच कारण नाही. स्वत: पंतप्रधान मी सर्व भारतीयांचा म्हणजे, त्यांना मत न दिलेल्यांचासुद्धा पंतप्रधान असल्याचे म्हणत आहेत. याआधी अशाप्रकारची भाषा आम्ही मोदींकडून ऐकली नव्हती.” असेही थरुर म्हणाले.

Story img Loader