विषबाधा झालेले आतडे शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकल्यानंतर दिल्ली बलात्कार प्रकरणातील २३ वर्षीय पीडित तरुणीची प्रकृती आता स्थिर असून ती भानावर आली आह़े  अशी माहिती तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी गुरुवारी दिली़
गुरुवारी सकाळपासून तिची प्रकृती स्थिर आह़े  परंतु, अजूनही तिला अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आह़े  रक्तदाब, श्वसनाचा दर आदी गोष्टींत अपेक्षित सुधारणा होत आहेत, असे सफदरजंग रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़  बी़  डी़  अथानी यांनी सांगितल़े  ती स्वत:हून श्वास घेण्याचा पयत्न करीत आह़े  तसेच आम्ही तिला शिरांतून संपूर्ण आहार देण्यास सुरुवात केली आह़े  तिच्या आतडय़ांना गंभीर इजा झाल्यामुळे तोंडावाटे मात्र ती अद्याप कोणताही आहार घेऊ शकत नाही, असेही त्यांनी अधिक माहिती देताना सांगितल़े  पीडितेच्या रक्तातील एकूण पेशींचे प्रमाण आणि घनास्त्रपेशीं(प्लेटलेट्स)चे प्रमाण मात्र किंचित घटल्याचेही अथानी म्हणाल़े    

Story img Loader