‘दी अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली. दिग्दर्शक विजय रत्नाकर गु्ट्टे याच्या व्हीआरजी डिजिटल कॉर्पोरेशन प्रा. लि. या कंपनीने बनावट इनव्हॉइसेस घेतले होते. गुट्टे हा इमॉशनल अत्याचार, बदमाशिया अशा चित्रपटांचा निर्माताही होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वस्तू आणि सेवा कर गुप्तचर विभागाच्या महासंचालकांनी १७३ कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याचा तपास मे महिन्यात सुरु केला होता. या तपासादरम्यान विजय गुट्टे याच्या व्हीआरजी डिजिटल कॉर्पोरेशन प्रा. लि. या कंपनीने अॅनिमेशन आणि मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी होरायझन आऊटसोर्स सोल्यूशन्स प्रा. लि. या कंपनीकडून ३४ कोटी रुपयांच्या जीएसटीचे बनावट इनव्हॉइसेस घेतल्याचे उघड झाले. गुट्टे याच्या कंपनीने केंद्रीय मूल्यवर्धीत कराचा परताव्यापोटी सरकारकडून २८ कोटी रुपयांच्या परताव्याच्या दावा केला होता. या घोटाळ्याप्रकरणी विजय गुट्टेला अटक करण्यात आली. न्यायालयाने गुट्टेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

विजय गुट्टेने इमॉशनल अत्याचार, टाईम बरा -वाईट आणि बदमाशिया या तीन चित्रपटांची निर्मिती केली होती. तर ‘अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाचा तो दिग्दर्शक आहे. दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात अनुपम खेर मुख्य भूमिका साकारत आहेत.

विजय गुट्टेचे वडील रत्नाकर गुट्टे यांच्यावरही पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गंभीर आरोप केले होते. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर्सचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांनी २२ बोगस कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे २६ हजार शेतकऱ्यांना तसेच व अनेक बँकांना सुमारे साडेपाच हजार कोंटींना फसवल्याचा आरोप त्यांनी केला होता. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत रत्नागर गुट्टे यांनी गंगाखेडमधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.