पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि माजी क्रिकेटर इम्रान खान हे कायमच कुठल्या ना कुठल्या गोष्टींमुळे चर्चेत असतात किंवा वादाच्या भोवऱ्यात अडकतात. आता इम्रान खान आणि आयला मलिक या दोघांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या महिलेला इम्रान खान यांनी ७० लाख रूपये दिले होते असंही समोर येतं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय चर्चा होते आहे या ऑडिओ क्लिपबाबत?
काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इम्रान खान आणि आयला मलिक यांची ही ऑडिओ क्लिप आयएसआय या एजेन्सीने रेकॉर्ड केली आहे आणि ती व्हायरलही केली आहे. इम्रान खान यांच्या पक्षाने मात्र ही क्लिप खोटी असल्याचा दावा केला आहे. या क्लिपमध्ये ज्या महिलेचा आवाज आहे तो आवाज आयला मलिक यांचा असल्याचंही सांगितलं जातं आहे.

आयला मलिक कोण आहेत?
आयला मलिक या महिला इम्रान खान यांचा पक्ष तहरीक ए इन्साफ या पक्षाशी संबंधित आहेत. आयला मलिक यांनी पाकिस्तानच्या खासदार म्हणूनही काम पाहिलं आहे. पाकिस्तानच्या सर्वात सुंदर महिलांपैकी एक म्हणून आयला मलिक ओळखल्या जातात. त्यांनी इम्रान खान निवडणुकीला उभे असताना त्यांचा प्रचारही केला होता.

इम्रान खान आणि आयला मलिक यांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये काय?
इम्रान खान आणि आयला मलिक यांच्या कथित लिक झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये या दोघांची अश्लील चर्चा आहे. या दोघांची ही क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे दुसरीकडे ही क्लिप पूर्णतः बनावट असल्याचा दावा इम्रान खान यांच्या पक्षाने केला आहे. आयला मलिक आणि इम्रान खान हे अनेक कार्यक्रमांत एकत्र दिसले आहेत

आयला मलिक यांचं आयुष्य वादग्रस्त

आयला मलिक या पाकिस्तानातल्या नवाब घराण्यातल्या आहेत. त्यांचं कुटुंब इंग्रजांच्या काळातही सक्रिय होतं. १९६७ मध्ये नवाब कलाबाग यांचा मृत्यू झाला. मात्र आयला मलिक यांचं कुटुंब राजकारणात सक्रिय होतं. नवाब कलाबाग यांना त्यांच्या पत्नीने म्हणजेच आयला मलिक यांच्या आईने ठार केल्याचीही चर्चा रंगली होती. मात्र खरंच असं घडलं होतं का? ते स्पष्ट झालेलं नाही.

आयला मलिक यांचं शिक्षणासाठी इस्लामाबादमधल्या शाळेत जाऊ लागल्या. मात्र त्या त्यांचं शिक्षण पूर्ण करू शकल्या नाहीत. त्या इंटर झाल्याचं प्रमाणपत्र बनावट असल्याचं बोर्डाने जाहीर केलं होतं. त्यानंतर त्यांनी आपण रशियाच्या विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केल्याचाही दावा केला होता. मात्र निवडणूक आयोगाने ते प्रमाणपत्रही खोटं असल्याचं जाहीर केलं.

शिक्षण कमी असूनही आयला मलिक या सुरूवातीला प्रसिद्ध टीव्ही अँकर आणि त्यानंतर प्रसिद्ध ऱाजकारणीही झाल्या. आयला मलिक या राष्ट्रीय स्तरावरच्या बॅडमिंटन प्लेअरही होत्या. त्या बंदूकही चालवत. २०१३ मध्ये मियाँवली या भागात कुणीतरी त्यांच्या ताफ्यावर गोळी चालवली तेव्हा प्रत्युत्तर देत आयला मलिक यांनीही गोळी चालवली होती.

आयला मलिक यांचे दोन विवाह झाले आहेत. मात्र त्यांची दोन्ही लग्न मोडली आहेत. आयला मलिक यांनी १९९८ मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. सुरूवातीला त्या त्यांचे काका अहमद लेघारी यांच्या मिल्लत पक्षात होत्या. आयला मलिक यांना या पक्षाचं सचिव पदही देण्यात आलं होतं.

आयला मलिक या २००२ ते २००७ या कालावधीत आमदारही होत्या. त्यांची बहीण सुमायरा मलिक यादेखील आमदार होत्या. राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्या इम्रान खान यांच्या निकटवर्तीय झाल्या. दुनिया न्यूजसाठी अँकर म्हणून काम करत असताना त्यांची ओळख पहिल्यांदा इम्रान खान यांच्याशी झाली होती. २०११ मध्ये आयला मलिक यांनी इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ या पक्षात प्रवेश केला. त्यावेळी त्या पक्षाच्या सोशल मीडिया प्रमुख होत्या.

आत्ता ज्या कथित ऑडिओ क्लिप लिक झाल्या आहेत त्या याच काळातल्या आहेत असंही बोललं जातं आहे. कारण हाच तो कालावधी होत्या ज्यावेळी आलिया मलिक या इम्रान खान यांच्या गळ्यातील ताईत झाल्या होत्या. इम्रान खान आणि त्यांच्यातली जवळीक या कालावधीत इतकी वाढली होती की मियांवली येथील आपली सीटही इम्रान खान यांनी आयला मलिक यांना दिली. आता या दोघांची कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. मात्र या दोघांचे प्रेम संबंध हे आत्ताचे नाहीतर फार पूर्वीपासूनचे आहेत. आयला मलिक यांनी २०१७ मध्ये इम्रान खान यांचा पक्ष सोडला. आता त्यांच्या कथित क्लिप्स बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.