आशा, विश्वास आणि अपेक्षांचा अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलं आहे. देशाला निराशेच्या गर्तेतून बाहे काढणारा हा अर्थसंकल्प आहे यात काहीही शंका नाही. या बजेटमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

देशातील गरीब जनतेचा, प्रत्येक घटकाचा विचार करून सादर झालेला हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. या अर्थसंकल्पामुळे मध्यमवर्गीयांचीही प्रगती साधली जाईल. नवभारत निर्मितीच्या पथावर जाणारे हे बजेट आहे असेही मोदींनी म्हटले आहे.

२१ व्या शतकातील आशा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे विकासाचा वेग वाढणार आहे. देशाची विकासाची गती योग्य आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटी, सोलर सेक्टर यावर अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. पर्यावरणाचा विचार करून अर्थसंकल्पात करण्यात आला आहे ही देखील चांगली बाब आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार चालू शकणार आहे ही महत्त्वाची घोषणा केली. तसेच सोनं आणि इंधन यावरचा कर वाढवला आहे त्यामुळे आता सोनं आणि पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ होणार आहे.

Story img Loader