पीटीआय, लंडन

ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेले बर्मिंगहॅम शहर दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात आले. या शहराच्या स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक सेवा राखण्यावर लक्ष केंद्रीत केले असून गरज नसलेल्या खर्चावर कात्री लावली आहे. लाखो पौंडांच्या वार्षिक अर्थसंकल्पीय तुटवडय़ामुळे शहर प्रशासनाने दिवाळखोरी घोषित केली.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sudhir Mungantiwar, Sudhir Mungantiwar Nagpur,
काँग्रेसची सध्याची अवस्था ‘चाची ४२०’ प्रमाणे, मुनगंटीवार यांची टीका
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

बर्मिंगहॅम नगर प्रशासनावर मजूर पक्षाची सत्ता आहे. १०० हून अधिक नगरसेवकांचा समावेश असलेली हे युरोपमधील सर्वात मोठे स्थानिक प्राधिकरण आहे. दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहराच्या प्रशासनाने मंगळवारी कलम ११४ नोटीस काढून दिवाळखोरी घोषित केली. शहरातील नागरिकांचे आर्थिक संरक्षण करणे महत्त्वाचे असून वैधानिक सेवा वगळता नवीन खर्च थांबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. नगर प्रशासनाने अंतरिम वित्त संचालक, फिओना ग्रीनवे यांनी स्थानिक सरकार कायद्याच्या कलम ११४ (३) अंतर्गत एक अहवाल जारी केला. समान वेतन खर्च पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडे अपुरी संसाधने असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.