पीटीआय, वॉशिंग्टन : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेले आरोप अमेरिकेने स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. सत्तेतून काढून टाकण्याचा कट अमेरिकेने रचला होता, असा आरोप इम्रान खान यांनी केला होता. इम्रान खान हे प्रोपगंडाचा वापर करत असून चुकीची आणि तथ्यहीन माहिती सांगत आहेत, असे अमेरिकेने म्हटले आहे. खान यांनी आरोप केला असला तरी द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होऊ देणार नाही, असा पुनरुच्चारही अमेरिकेने केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इम्रान खान यांनी पुन्हा निवडून आल्यास त्यांना अमेरिकेशी संबंध सुधारायचे आहेत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून हटवल्याबद्दल त्यांना दोष देणार नाही, असे म्हटल्यानंतर बुधवारी अमेरिकेकडून तीव्र प्रतिक्रिया आली. ‘आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे इम्रान खान यांच्या आरोपांमध्ये सत्यता नाही आणि कधीच नव्हती,’ असे अमेरिकचे प्रतिनिधी वेदान्त पटेल यांनी सांगितले. एप्रिलमध्ये इम्रान खान यांनी पाकिस्तानी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर मला पदच्युत करण्यामागे परकीय शक्तींचा हात असल्याचा दावा केला होता. त्यांचा रोख अमेरिकेकडे होता.

इम्रान खान यांच्या मोर्चाला विरोध करणारी याचिका फेटाळली

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या निषेध मोर्चाला विरोध करणारी याचिका पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. हा राजकीय मुद्दा असून तो राजकीय पद्धतीने सोडवला पाहिजे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.  सत्ताधारी पक्षाचे संसद सदस्य कामरान मुर्तझा यांनी इम्रान खान यांचा पक्ष असलेला ‘पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ’ काढत असलेल्या निषेध मोर्चाला विरोध केला. हा मोर्चा थांबवण्याची मागणी त्यांनी याचिकेत केली होती. इम्रान खान यांनी या मोर्चाचे वर्णन ‘इकीकी आझादी’ (वास्तविक स्वातंत्र्य) असे केले आहे. पक्षकारांच्या सविस्तर युक्तिवादानंतर, सरन्यायाधीश म्हणाले, ‘ही एक राजकीय समस्या आहे जी राजकीय पद्धतीने सोडविली जाऊ शकते.’ त्यानंतर न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. युक्तिवादादरम्यान सरन्यायाधीशांनी अशीही टिप्पणी केली की, देशाला भेडसावणाऱ्या राजकीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी संसद मजबूत केली पाहिजे. जर घटनात्मक उल्लंघनाचा स्पष्ट धोका असेल तरच सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करेल. संविधान प्रत्येकाला शांततापूर्ण निषेध करण्याची परवानगी देते, परंतु ते कायद्याच्या मर्यादेत असले पाहिजे.