अमिरात एअरलाइन्समधून प्रवास करणारे सुमारे १०० प्रवाशांची प्रकृती अचानक खालावली. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार न्यूयॉर्कमधील जेएफके विमानतळावर उतरवण्यात आलेल्या या विमानात सुमारे १०० आजारी प्रवासी आढळून आले. यातील १२ जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. अमिरातचे हे विमान दुबईहून न्यूयॉर्कच्या जॉन एफ. केनेडी विमानतळावर उतरवण्यात आले. विमानात ५२१ प्रवासी होते. क्रू सदस्यांपैकीही काही लोक आजारी पडल्याचे सांगण्यात येते. विमानतळावरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश प्रवाशांनी खोकला आणि ताप आल्याची तक्रार केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे विमान सकाळी ९.१० मिनिटांनी उतरवण्यात आले. तिथे आधीपासून विमानतळ प्राधिकरणाचे वैद्यकीय पथक प्रवाशांच्या तपासणीसाठी तयारीत होते. प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यातील अनेक लोकांना रूग्णालयात नेण्यात आले. न्यूयॉर्क शहराच्या महापौरांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे.

तत्पूर्वी, अमिरात एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात विमानातील १० लोकांची प्रकृती बिघडली असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. एकाने दिलेल्या माहितीनुसार हे विमान मक्का येथे थांबवण्यात आले होते. तिथे सध्या फ्ल्यूची साथ सुरू आहे. यामुळेच प्रवाशांची प्रकृती बिघडण्यामागचे कारण असल्याचे सांगण्यात येते. एका प्रवाशाने सोशल मीडियावर रनवेवर उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाचे छायाचित्र शेअर केले आहे. तर दुसऱ्या एका प्रवाशाने आपल्या बाजूला अनेक आजारी प्रवासी पाहिल्याचे सांगितले. जे प्रवासी ठीक आहेत, ते आपला प्रवास कायम ठेऊ शकतात, असे विमान कंपनीने म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The condition of 100 passengers from dubai to new york fell sick in emirates airline
Show comments