पीटीआय, नवी दिल्ली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
घटनापीठाने ३ विरुद्ध २ अशा मतविभागणीने समलिंगी जोडप्यांना मूल दत्तक घेता येणार नाही असा निर्णय दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड आणि न्या. कौल यांनी समलिंगी जोडप्यांना मूल दत्तक घेण्यास मनाई करणारी कायद्यातील तरतूद घटनाबाह्य आणि बेकायदा असल्याचे नमूद केले. तर न्या. भट, न्या. कोहली आणि न्या. नरसिंह यांनी समलिंगी जोडप्यांना मूल दत्तक घेण्यास मनाई करणारा सध्याचा कायदा योग्य असल्याचे सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जोडप्याने एकत्रितपणे मूल दत्तक घेण्याचे समलैंगिकांचे स्वप्न सध्या तरी प्रत्यक्षात अवतरण्याचे चिन्ह नाही. बंगळुरूमधील ऋषी आणि आर्यन (नावे बदलली आहेत) हे जोडपे गेल्या १५ वर्षांपासून एकत्र आहेत. त्यांनी स्वतंत्रपणे एकेकटय़ाने मूल दत्तक घेतले आहे. आधी २०१६ मध्ये आणि नंतर २०२२ मध्ये त्यांनी स्वतंत्रपणे एकेक मुलगा दत्तक घेतला. मात्र कुटुंब म्हणून एकत्र राहण्याचे त्यांचे स्वप्न धुळीला मिळाले आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे घोर निराशा झाल्याचे त्यांनी सांगितले.
आमचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे हे आमच्या मुलांना माहित आहे. पण कायदा आमचे प्रेम खरे मानत नाही याची त्यांना सतत जाणीव करून दिली जाते. हे भावनिक ओझे आता आम्हाला सहन होत नाही आणि त्याचा आमच्या मुलांवर होणारा परिणाम आम्हाला रोज दिसतो असे आर्यन यांनी सांगितले.