क्युबात कहर केल्यानंतर अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात ‘इयान’ चक्रीवादळाने जोरदार धडक दिली आहे. इयान चक्रीवादळ बुधवारी फ्लोरिडाच्या नैऋत्य किनार्‍यावर सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसासह धडकले. त्यामुळे तेथील रस्ते जलमय झाले असून अनेक गाड्या त्यात वाहून गेल्या आहेत. फ्लोरिडामध्ये या श्रेणी-४ मधील विनाशकारी चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.

आतापर्यंत अमेरिकेती आलेल्या चक्रीवादळांपैकी इयान चक्रीवादळ हे सर्वात शक्तीशाली असल्याचं सांगण्यात येत आहे. एका न्यूज चॅनलचा रिपोर्टर या विनाशकारी वादळाची बातमी करण्यासाठी रस्त्यावर उतरला असता, तो या चक्रीवादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासमोर टिकाव धरू शकत नसल्याचे एका व्हिडिओत दिसून आले आहे. याशिवाय, समुद्रातील शार्क देखील आता शहरातील रस्त्यांवर दिसून येत आहेत. इयान चक्रीवादळ बुधवारी अमेरिकेच्या फ्लोरिडा किनारपट्टीला धडकले, मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे. चक्रीवादळाच्या व्हिज्युअलमध्ये, जे आतापर्यंत यूएस मध्ये नोंदवले गेलेले सर्वात शक्तिशाली वादळ आहे.

National Hurricane Centerने (एनएचसी) म्हटले आहे की, ‘इयान’ ताशी २४० किलोमीटर वेगाने फ्लोरिडा किनाऱ्यावर धडकले. जेव्हा वादळ आले तेव्हा तिथे आधीच पाऊस पडत होता. वादळाच्या प्रभावामुळे “फ्लोरिडा द्वीपकल्प” मध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. विनाशकारी वादळाची भयानक दृश्ये सर्वत्र पाहायला मिळत आहेत.

वादळामुळे संपूर्ण फ्लोरिडा, जॉर्जिया आणि दक्षिण कॅरोलिना या दक्षिण-पूर्व राज्यांमध्ये लाखो लोक प्रभावित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बोट बुडाल्यानंतर २० स्थलांतरित बेपत्ता असल्याची देखील माहिती आहे. तटरक्षक दलाने फ्लोरिडा कीजमध्ये वाहून जाणाऱ्या काही जणांना वाचवले आहे.