इंग्लंड देशाच्या राजघराण्याला नवा वारस मिळाला आहे कारण प्रिन्स हॅरीची पत्नी मेगन मार्केलने बाळाला जन्म दिला. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल यांना पुत्ररत्न झाले आहे. आजच (६ मे २०१९) मेगन मार्केल शाही रूग्णालयात पोहचली होती. रुग्णालयात पोहचल्यानंतर काही वेळातच मेगनने मुलाला जन्म दिला. या दोघांचे हे पहिलेच अपत्य आहे. मेगन मार्केलच्या बाळाचे जन्म झाल्यानंतर वजन ७ पाऊंड इतके होते असेही समजते आहे. बाळ आणि त्याची मेगन यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती प्रिन्स हॅरीने दिली आहे. आज सकाळी आम्हाला मुलगा झाला हे देखील त्याने प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेगन आणि मी आई बाबा झालो ही बाब खूप आनंददायी आहे. मी आता चंद्रावर आहे असेच मला वाटते आहे अशी प्रतिक्रिया प्रिन्स हॅरीने दिली. प्रिन्स विल्यम आणि मेघन मार्केल यांनी मे २०१८ मध्ये विवाह केला होता. या विवाहाची जगभर चर्चा झाली होती. तसेच, या विवाहासाठी जगभरातील देशांतून पाहुणे उपस्थित होते. इंग्लंडच्या राजघराण्याला नवा वारस मिळणार असल्याची बातमी मुद्दामहून गुप्त ठेवण्यात आली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राजघराण्याला वारस मिळणार असल्याची बातमी प्रसारमाध्यमांतून आली होती.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The duchess of sussex meghan has given birth to a boy