नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी सायंकाळी पार पडला. पंतप्रधानांसह ३० कॅबिनेट, पाच स्वतंत्र कारभार असलेले राज्यमंत्री व ३६ राज्यमंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राज्यातील सहा जणांना पहिल्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले असून यात तीन नवे चेहरे आहेत. या शपथविधीने वाजपेयी सरकारनंतर पुन्हा एकदा रालोआचा कालखंड सुरू झाला आहे. दरम्यान, आज सायंकाळी पाच वाजता एनडीए सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मोदींच्या निवासस्थानी संध्याकाळी ५ वाजता नव्याने समाविष्ट झालेल्या मंत्र्यांची बैठक होणार आहे. भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही मोदी सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात समाविष्ट झालेल्यांसाठी डिनरचे आयोजन केले होते, असे सूत्रांनी सांगितले.

कुमारस्वामी, शिवराजसिंह चौहान, खट्टर, सर्बानंद सोनोवाल, मांझी आणि राजनाथ सिंह या सहा माजी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारमध्ये नवी भूमिका स्वीकाली आहे. तर मागच्या मंत्रिमंडळातील नारायण राणे, स्मृती इराणी, अनुराग ठाकूर आणि राजीव चंद्रशेखर या महत्त्वाच्या मंत्र्यांना वगळण्यात आले आहे. नव्या मंत्रिमंडळात २७ ओबीसी, १० दलित, ५ आदिवासी, ५ अल्पसंख्याक नेत्यांचा समावेश आहे. अश्विनी वैष्णव, हरदीपसिंह पुरी, जयशंकर, कुरियन, सीतारामन हे राज्यसभेतील खासदार मंत्री असून पंजाबमधील रवनीतसिंह बिट्टू आणि तमिळनाडूतील एम. मुरुगन यांना लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही केंद्र सरकारमध्ये स्थान देण्यात आले आहे. या नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक होणार असून पहिल्याच बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा, कोणते निर्णय घेतले जातात हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा >> नव्या रालोआपर्वाची सुरुवात; राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात भव्य शपथविधी सोहळा

नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळाची संपूर्ण यादी :

अ. क्र.नावपक्षाचे नावराज्यमतदारसंघ
नरेंद्र मोदीभाजपाउत्तर प्रदेशवाराणसी
राजनाथ सिंहभाजपाउत्तर प्रदेशलखनौ
किंजरापू राम मोहन नायडूटीडीपीआंध्र प्रदेशश्रीकाकुलम
चंद्रशेखर पेम्मासानीटीडीपीआंध्र प्रदेशगुंटूर
प्रतापराव जाधवशिवसेनामहाराष्ट्रबुलढाणा
रामनाथ ठाकूरJD(U)बिहारराज्यसभा खासदार
एच डी कुमारस्वामीजेडी (एस)कर्नाटकमंड्या
अर्जुन राम मेघवालभाजपाराजस्थानबिकानेर
सर्बानंद सोनोवालभाजपाआसामदिब्रुगड
१०जितन राम मांझीहामबिहारगया
११सुरेश गोपीभाजपाकेरळत्रिशूर
१२हरदीप सिंग पुरीभाजपापंजाब
१३रवनीत सिंग बिट्टूभाजपापंजाब
१४नितीन गडकरीभाजपामहाराष्ट्रनागपूर
१५पियुष गोयलभाजपामहाराष्ट्रमुंबई उत्तर
१६रामदास आठवलेRPI(A)महाराष्ट्र
१७रक्षा खडसेभाजपामहाराष्ट्ररावेर
१८धर्मेंद्र प्रधानभाजपाओडिशासंबलपूर
१९प्रल्हाद जोशीभाजपाकर्नाटकधारवाड
२०बंदी संजय कुमारभाजपातेलंगणाकरीमनगर
२१हर्ष मल्होत्रा ​​भाजपादिल्लीपूर्व दिल्ली
२२श्रीपाद नाईकभाजपागोवाउत्तर गोवा</td>
२३अजय तमटाभाजपाउत्तराखंडअल्मोरा
२४एस जयशंकरभाजपागुजरातराज्यसभा
२५मनसुख मांडवियाभाजपगुजरातपोरबंदर
२६अश्विनी वैष्णवभाजपओडिशाराज्यसभा
२७निर्मला सीतारमणभाजपकर्नाटकराज्यसभा
२८जितेंद्र सिंहभाजपजम्मू आणि काश्मीरउधमपूर
२९चिराग पासवानLJP(RV)बिहारहाजीपूर
३०ज्योतिरादित्य सिंधियाभाजपमध्य प्रदेशगुना
३१किरेन रिजिजूभाजपाअरुणाचल प्रदेशअरुणाचल पश्चिम
३२गिरीराज सिंहभाजपाबिहारबेगुसराय
३३जयंत चौधरीRLDउत्तर प्रदेशराज्यसभा
३४अन्नामलाईभाजपातामिळनाडू
३५एमएल खट्टरभाजपाहरियाणाकर्नाल
३६जी किशन रेड्डीभाजपातेलंगणासिकंदराबाद
३७चंद्रशेखर चौधरीAJSUझारखंडगिरडीह
३८जितिन प्रसादभाजपाउत्तर प्रदेशपिलीभीत
३९पंकज चौधरीभाजपाउत्तर प्रदेशमहाराजगंज
४०बीएल वर्माजेडीयूउत्तर प्रदेश
४१लालन सिंगएडीबिहारमुंगेर
४२अनुप्रिया पटेलभाजपाउत्तर प्रदेश
४३अन्नपूर्णा देवीभाजपाझारखंडकोडरमा
४४कमलजीत सेहरावतभाजपदिल्लीपश्चिम दिल्ली
४५राव इंद्रजीत सिंगभाजपहरियाणागुरुग्राम
४६भूपेंद्र यादवभाजपाराजस्थानराज्यसभा
४७संजय सेठभाजपाझारखंडरांची
४८कृष्ण पाल गुर्जरभाजपाहरियाणा
४९अमित शाहभाजपागुजरातगांधीनगर
५०जेपी नड्डाभाजपगुजरातराज्यसभा
५१जुआल ओरमभाजपाओडिशासुंदरगड
५२गजेंद्र सिंह शेखावतभाजपाराजस्थानजोधपूर
५३सीआर पाटीलभाजपागुजरातनवसारी
५४शोभा करंदलाजेभाजपाकर्नाटकबंगळुरू उत्तर
५५किर्ती वर्धन सिंहभाजपाउत्तर प्रदेशगोंडा
५६शंतनू ठाकूरभाजपापश्चिम बंगालबनगाव
५७एल मुरुगनद्रमुकतामिळनाडूनिलगिरी
५८कमलेश पासवानभाजपाउत्तर प्रदेशबनसगाव
५९भगीरथ चौधरीभाजपाराजस्थानअजमेर
६०वी सोमन्नाभाजपाकर्नाटकतुमकूर
६१तोखान साहूभाजपाछत्तीसगडबिलासपूर
६२सतीशचंद्र दुबेभाजपाबिहारराज्यसभा
६३दुर्गा दास उईकेभाजपमध्य प्रदेशबैतुल
६४सुकांता मजुमदारभाजपापश्चिम बंगालबालूरघाट
६५सावित्री ठाकूरभाजपमध्य प्रदेशधार
६६राज भूषण चौधरीभाजपाबिहारमुझफ्फरनगर
६७भूपती राजू श्रीनिवास वर्माभाजपाआंध्र प्रदेशनरसापुरम
६८निमुबेन जयंतीभाई बांभनियाभाजपागुजरातभावनगर
६९मुरलीधर मोहोळभाजपामहाराष्ट्रपुणे
७०पवित्र मार्गेरिताभाजपआसामराज्यसभा
७१जॉर्ज कुरियनभाजपकेरळ