१८ व्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता नवं सरकार सत्तेवर आलं आहे. एनडीए आघाडीअंतर्गत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली असून आणखी ७० जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसंच, या मंत्र्यांना खातेवाटपही करण्यात आलं आहे. दरम्यान, आता नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन २४ जूनपासून सुरू होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भातील घोषणा आज बुधवारी केली. पहिल्या तीन दिवसांमध्ये नवीन सदस्यांचा शपथविधी आणि सभागृहाच्या अध्यक्षाची निवड करण्यात येईल. हे अधिवेशन ३ जुलै रोजी संपेल.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. इथंच त्या नवीन सरकारच्या पंचवार्षिक योजनेची रुपरेषा सांगण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut On Dhananjay Munde and PM Modi Mumbai Visit
Dhananjay Munde : “…मग धनंजय मुंडेंवर अन्याय का?”, PM मोदींच्या कार्यक्रमापासून दूर ठेवल्याच्या मुद्यावर राऊतांचा थेट सवाल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; महायुतीच्या आमदारांशी साधणार संवाद
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Malad Mith Chowki flyover , traffic,
मुंबई : मालाड मीठ चौकी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा
Parliamentary committee meeting opposition aggressive on one nation one election issue
संसदीय समितीची वादळी बैठक ,‘एक देश एक निवडणूक’ मुद्द्यावर विरोधक आक्रमक
Ajit Pawar discussion with Amit Shah in Delhi
अजित पवारांची दिल्लीत अमित शहांशी चर्चा
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”

१८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जून ते ३ जुलै या कालावधित नवनिर्वाचित सदस्यांची शपथ, सभापती निवड, राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि त्यावरील चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे, असं किरेन रिजिजू यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा >> लोकसभा अध्यक्षपदासाठी चुरस;भाजपकडून ओम बिर्ला यांच्यासह पुरंदेश्वरी यांचेही नाव चर्चेत

रिजिजू यांनी असेही नमूद केले आहे की, “राज्यसभेचे २६४ वे अधिवेशन २७ जून रोजी सुरू होईल आणि ३ जुलै रोजी संपेल. पंतप्रधान मोदी २७ जून रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर त्यांच्या मंत्रिमंडळांची संसदेत ओळख करून देतील, अशी अपेक्षा आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर आक्रमक चर्चा होण्याची अपेक्षा आहे. विरोधकांनी एनडीए सरकारला अनेक मुद्द्यांवर आव्हान देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात आभार प्रस्तावावर चर्चेला पंतप्रधान उत्तर देतील.

लोकसभा अध्यक्ष कोण होणार?

मावळते लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला पुन्हा हेच पद मिळवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. एकाच नेत्याला पुन्हा त्या पदावर बसवण्याची भाजपची परंपरा नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून धक्कातंत्राचा वापर केला जाऊ शकतो. या पदावर महिला वा दलित नेत्याचीही वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंध्र प्रदेश भाजपच्या अध्यक्ष डी. पुरंदेश्वरी यांच्या नावाची चर्चा केली जात आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व नामवंत अभिनेते एनटी रामाराव यांच्या पुरंदेश्वरी कन्या आहेत.

हेही वाचा >> लोकसभा अध्यक्षांचे अधिकार काय असतात? भाजपा आणि मित्रपक्षांसाठी हे पद इतके महत्त्वाचे का आहे?

घटक पक्षांसाठी उपाध्यक्षपद

भाजपकडून घटक पक्षांना लोकसभेचे उपाध्यक्षपद दिले जाऊ शकते. तेलुगु देसम व जनता दल (सं) या दोन्ही पक्षांना केंद्रापेक्षा आपापल्या राज्याचे हितसंबंध जपण्यामध्ये अधिक स्वारस्य असल्याने त्यांच्याकडून हे पद स्वीकारले जाऊ शकते. १७ व्या लोकसभेच्या संपूर्ण कालावधीत केंद्र सरकारने उपाध्यक्ष पद रिक्त ठेवले होते.

Story img Loader