गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन मीटिंगचं प्रस्थ अधिक वाढत आहे. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून आपण महत्त्वाच्या बैठकीला ऑनलाईन हजर राहू शकतो. परंतु, या डिजिटायजेशनमुळे अनेकदा गोंधळही उडतो. आपल्याला डिजिटायजेशनची इतकी सवय झाली आहे की आपण कुठंही बसून मीटिंगला हजेरी लावू शकतो. अगदी शौचास गेल्यावरही आपल्या हातातील मोबाईल सुटत नाही. मानवाची हीच सवय ब्राझीलच्या रिओ डी जनेरियाचे माजी महापौर सीझर माईया यांच्या अंगलट आली आहे. त्यांना एका खाजिल परिस्थितीला सामोरं जावं लागलं आहे. इंडिपेंडंटने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ब्राझीलच्या रिओ डी जनेरियोचे तीन वेळा महापौर असलेले सीझर माईया बुधवारी टॉयलेट सीटवर बसलेले असताना ऑनलाइन मीटिंगमध्ये सहभागी झाले. रिओ डी जनेरियोमधील सिटी हॉलचे माजी महापौर सीझर माईया यांनी इतर कौन्सिल सदस्यांसह झूम कॉन्फरन्ससाठी लॉग इन केले होते. परंतु, त्यांचा वेब कॅमेऱ्या तेवढ्यात सुरू झाला. त्यामुळे त्यांच्या टॉयलेट सीटवरील त्यांचं दृष्य इतरांनाही दिसलं. या खाजिल परिस्थितीत त्यांनी लागलीच त्यांचा कॅमेरा बंद केला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नंतर माइया यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केले आणि माफी मागितली. स्काय न्यूजच्या वृत्तानुसार, त्यांच्या प्रेस ऑफिसच्या म्हणण्यानुसार, ७८ वर्षीय माईया यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे त्यांनी मोबाईल हातात घेतला आणि तेवढ्यात त्यांचा कॅमेरा सुरू झाला.

विवेक रामास्वामींबरोबरही घडला होता प्रकार

अशा घटना याआधीही अनेकदा घडल्या आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये, भारतीय-अमेरिकन उद्योजक आणि रिपब्लिकन नेते विवेक रामास्वामी यांच्याबरोबरही असाच लाजिरवाणा प्रकार घडला होता. स्पेसएक्स आणि टेस्ला प्रमुख एलोन मस्क, ॲलेक्स जोन्स आणि इतर अनेकांशी थेट X Spaces चॅट दरम्यान हा प्रकार घडला. या चॅटला सुमारे 2.3 दशलक्ष श्रोत्यांनी ट्यून केले होते.

इन्फोवार्सचे संस्थापक ॲलेक्स जोन्स यांना सोशल मीडिया नेटवर्कवर परत आणण्यासाठी एलॉन मस्क अधिकाऱ्यांशी संवाद साधत, त्यावेळी त्यांच्या संभाषणात व्यत्यय आणून रावस्वामी यांनी बैठकीतून रजा घेतली. दरम्यान, सत्र सुरू असताना अनेकांना पाण्याच्या प्रवाहाचा आवाज ऐकू आला. ॲलेक्स जोन्स यांनी निदर्शनास आणून दिले की त्यांचा फोन बाथरुममध्येच आहे. प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या स्पेसेस चॅटच्या रेकॉर्डिंगनुसार, होस्ट मारिओ नवाफल म्हणाले, “विवेक, तो तुझा फोन आहे. पण मी तुला म्यूट करू शकत नाही.” रामास्वामी यांना काय घडले ते तत्काळ समजले आणि त्यांनी लाजिरवाण्या क्षणाबद्दल लगेच माफी मागितली.