नव्या संसद भवनाचा भूमिपूजन सोहळा १० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही माहिती दिली.
There will be approximately 888 seats for Lok Sabha members and more than 326 seats for Rajya Sabha members in the new building. Lok Sabha hall will be able to accommodate 1224 members simultaneously: Lok Sabha Speaker Om Birla
— ANI (@ANI) December 5, 2020
बिर्ला म्हणाले, “नव्या संसद भवनाची क्षमता ही जुन्या भवनापेक्षा अधिक असून नव्या भवनात एकाच वेळी लोकसभा सदस्यांसाठी सुमारे ८८८ जागा उपलब्ध असतील तर राज्यसभा सदस्यांसाठी ३२६ पेक्षा अधिक जागा उपलब्ध असतील. म्हणजेच नव्या संसद भवनात एकूण १,२२४ सदस्य एकाचवेळी बसू शकतील. ७५ व्या स्वातंत्र्यदिनी आपण या नव्या संसद भवनातून दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरु करणार आहोत.”
This will be built in an area of 64,500 sq.m at an expense of Rs 971 crores. Tata Projects Ltd has been given the contract for the project. The design has been prepared by HCP Design, Planning and Management Pvt Ltd: Lok Sabha Speaker Om Birla https://t.co/IAPTh0D1VF pic.twitter.com/SGJkLjvG77
— ANI (@ANI) December 5, 2020
“नव्या संसदेची इमारत ही आत्मनिर्भर भारताचं मंदिर असेल. यामध्ये भारतातील विविधतेचं दर्शन घडेल. जुन्या संसद भवनाच्या इमारतीपेक्षा नवी इमारत १७,००० स्केअर फूट मोठी असेल. एकूण ६४,५०० स्केअर मीटर जागेत ही वास्तू उभारली जाणार आहे. यासाठी ९७१ कोटी रुपये खर्च येणार असून ‘टाटा प्रोजेक्ट लिमिटेड’कडे या इमारतीच्या उभारणीचे कंत्राट देण्यात आले आहे. एचसीपी डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीने या इमारतीचे डिझाईन बनवले आहे,” अशी माहितीही यावेळी बिर्ला यांनी दिली.