ग्वाल्हेरमध्ये एका तीन वर्षांच्या बाळाबरोबर अत्यंत हृदयद्रावक अशी घटना घडली आहे. डायपर घातलेलं फक्त तीन वर्षांचं बाळ; मात्र, कुणीतरी त्याची अत्यंत घृणास्पदरित्या हत्या केल्याचं उघड झालं आहे. ग्वाल्हेरमध्ये शुक्रवारी (१९ जुलै) दुपारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : आत्महत्त्येचा बनाव बेतला जीवावर; घरातील भांडण शमवणाऱ्या लोको पायलटचा जागीच मृत्यू

नेमकं काय घडलं?

ग्वाल्हेरमधील स्थानिक रहिवाशांना रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका काळ्या पिशवीभोवती भरपूर माशा घोंघावताना दिसून आल्या. त्या पिशवीमधून प्रचंड दुर्गंधी येत होती. बहोदापूर येथील ट्रान्सपोर्ट नगरच्या पार्किंग क्रमांक १ मध्ये रस्त्याच्या कडेला ही पिशवी फेकून देण्यात आली होती. या पिशवीबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्या पिशवीला उघडून पाहिले; तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या पिशवीमध्ये पोलिसांना एका लहान बाळाचा मृतदेह सापडला. या बाळाचे वय साधारण तीनेक वर्षांचे असावे. या बाळाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि त्याचे हात आणि पाय दोरीने बांधलेले होते.

या बाळाची ओळख पटवण्यात पोलिसांना अद्याप तरी यश आलेले नाही. मात्र, या मृत बाळाचे तपशील प्राप्त व्हावेत, यासाठी त्यांनी जवळपासच्या जिल्ह्यांना सतर्क केले आहे. या चिमुरड्याच्या अंगावर लाल चड्डी आणि निळा टी-शर्ट घातला होता. त्याने डायपरही घातले होते.

हेही वाचा : VIDEO : मुलं जेवण करत असतानाच शाळेची भिंत कोसळली, सहा विद्यार्थी जखमी; घटना सीसीटीव्हीत कैद

अन्यत्र हत्या करुन रस्त्याकडेला टाकल्याचा संशय

पोलिसांनी मृतदेहासहित आजूबाजूच्या परिसराची तपासणी करण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञांना घटनास्थळी पाचारण केले आहे. या मुलाची इतरत्र हत्या करून त्याचा मृतदेह बहोदापूर येथे टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. कोणीतरी त्याची ओळख पटवू शकेल या आशेने पोलिसांनी बाळाचे उपलब्ध तपशील सार्वजनिक केले आहेत. सध्या पोलीस स्थानिकांचीही चौकशी करत असून कुणी या बाळाला अथवा या बाळासहित एखाद्या व्यक्तीला याआधी पाहिले आहे का, याचा शोध घेत आहेत.