‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीही या धोरणाचा अवलंब व्हावा असे, फडणवीस यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर लोकसभा, विधानसभा निवडणुकांबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही एकाच वेळी व्हायला हव्यात. मुंबईत एका कार्यक्रमात ते बोलत होते.


फडणवीस म्हणाले, निवडणुकांसाठी खर्च होणारा पैसा आणि मेहनत यांमुळे आपल्यासारख्या राजकीय लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येक निवडणुकीसाठी नवी रणनीती आखावी लागते कारण प्रत्येक निवडणुकीचा परिणाम दुसऱ्या निवडणुकीवर पडत असतो. यामुळे विविध पर्यायातून भविष्यासाठी योग्य पर्याय निवडण्याच्या प्रक्रियेवरही याचा प्रभाव पडतो.

शुक्रवारी दिल्लीत भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना ते म्हणाले होते की, राज्यातील विधानसभा निवडणुकीवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, ही निवडणूक भाजपाला शिवसेनेसोबत लढवणे गरजेचे आहे. भाजपाचे संगठन सचिव रामलाल यांना त्यांनी याची माहिती दिली. त्यांच्या या विधानानंतर शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी भाजपा पुढे येऊन प्रयत्न करेल असे वाटते. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी देखील येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चार चास चर्चा केली.

Story img Loader