नवी दिल्ली : राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे पडसाद विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीमध्ये उमटू लागले आहेत. ‘इंडिया’तील काँग्रेसच्या नेतृत्वाला तृणमूल काँग्रेसने आव्हान दिले आहे. काँग्रेसने आता स्वत:चा अहंकार बाजूला ठेवून तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व स्वीकारले पाहिजे, असा सल्ला तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सोमवारी सकाळी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनामध्ये ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये अधिवेशनातील विरोधकांची रणनीती निश्चित केली. मात्र, या बैठकीमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते सहभागी झालेले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उभे राहायचे असेल तर खमके आणि निर्णय घेण्याची क्षमता असलेले नेतृत्व लागेल.

हेही वाचा >>>“सगळ्यात जास्त वेदनादायी बाब ही आहे की…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना केलं लक्ष्य, ‘या’ मुद्द्यावर ठेवलं बोट

काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता नाही. ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व फक्त ममता बॅनर्जी करू शकतात, असा दावा कल्याण बॅनर्जी यांनी केला. तृणमूल काँग्रेसच्या टिप्पणीवर काँग्रेसने अजून प्रतिक्रिया दिलेली नाही.