देशभरात सध्या गाजत असलेल्या काळ्या पैशाच्या मुद्द्यासंदर्भात सोमवारी ‘द इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्रातर्फे महत्त्वपूर्ण माहिती जाहीर करण्यात आली. ‘द इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्राने परदेशातील एचएसबीसीमध्ये खाते असलेल्या भारतीयांची नावे जाहीर केली. भारतातील आघाडीचे अनेक उद्योजक आणि महाराष्ट्रातील राजकारणाशी संबंधित असलेल्या व्यक्तींचा या खातेधारकांमध्ये समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने मुकेश अंबानी, नरेश गोयल, राणे कुटुंबिय आणि स्मिता जयदेव ठाकरेंची नावे आहेत. एचएसबीसीमध्ये खाते असलेल्या भारतीयांची संख्या आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीच्या दुप्पट असून, या खातेधारकांच्या खात्यांमध्ये २५ हजार ४२० कोटी रुपये शिल्लक असल्याची माहिती ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने केलेल्या शोध पत्रकारितेतून पुढे आली आहे. या यादीमध्ये समावेश असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण भारतीय व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे:
मुकेश अंबानी– दोन हजार कोटींच्या संपत्तीचे मालक असणारे मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक म्हणून ओळखले जातात. त्यांनी २००१ साली एचएसबीसी बँकेत दोन खाती उघडली होती. सन २००६-०७ या आर्थिक वर्षात दोन्ही खात्यांतील एकूण रक्कम २.६६ कोटी इतकी होती. ‘द इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्राच्या हाती लागलेल्या माहितीनुसार फ्लॅग टेलिकॉम लिमिटेड आणि कॅनबर होल्डिंग कॉर्पोरेशनच्या यांच्या नावे ही खाती उघडण्यात आली आहेत. याशिवाय, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नावानेही २००७ मध्ये एचएसबीसीमध्ये एक खाते उघडण्यात आले होते. यावेळी या कंपनीच्या खात्यात तब्बल ६३८.६ कोटी इतकी रक्कम जमा होती. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने यासंदर्भात स्पष्टीकरण देताना हे खाते पूर्णपणे नियमांच्या कक्षेत असून, भारत आणि संबंधित यंत्रणेला यासंबंधीची पूर्वकल्पना देण्यात आलेली आहे.
स्पष्टीकरण- यासंदर्भात बोलताना रिलायन्सच्या प्रवक्त्यांनी जगभरात कुठेही रिलायन्स किंवा मुकेश अंबांनी यांच्या नावे अशी कोणतीही खाती असल्याचा वृत्ताचा इन्कार केला.
नरेश कुमार गोयल- जेट एअरवेजचे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल यांनी २००३ साली एचएसबीसीमध्ये तीन खाती उघडल्याची नोंद आहे. या खात्यांमध्ये २००६-०७ या आर्थिक वर्षात ११६ कोटी इतकी रक्कम जमा होती. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना गोयल यांच्या प्रवक्त्यांकडून नरेश गोयल हे अनिवासी भारतीय असल्यामुळे जगभरात कुठेही अशाप्रकारचे बँक खाते उघडू शकत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
स्मिता जयदेव ठाकरे (६४ लाख)- दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता जयदेव ठाकरे यांनी २००२मध्ये मुंबईतून एचएसबीसी बँकेत खाते उघडले होते. सन २००६-०७च्या नोंदीनुसार त्यांच्या खात्यामध्ये १०३,२३६ डॉलर्स इतकी रक्कम जमा होती.
निलम नारायण राणे , निलेश राणे– महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी निलम राणे आणि पूत्र निलेश राणे यांच्या एचएसबीसी खातेधारकांमध्ये समावेश आहे. मात्र, त्यांच्या खात्यातील रक्कमेचा अधिकृत आकडा अजूनपर्यंत समजू शकलेला नाही.
अनिल अंबांनी( १६४. ९२ कोटी)- मुकेश अंबांनी आणि अनिल अंबांनी हे दोघे विभक्त झाल्यानंतर अनिल अंबांनी यांनी रिलायन्स समुहाच्या टेलिकॉम, उर्जा आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित कंपन्यांची सूत्रे सांभाळली. त्यांच्या एसएसबीसी बँकेच्या खात्यात १६४.९२ कोटी इतकी रक्कम जमा असल्याचे समजते. मध्यंतरी ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या संस्थेतर्फे एसएसबीसी जिनिव्हा येथे अनिल अंबांनीचे खाते असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांनी हे आरोप साफ फेटाळून लावले होते. मात्र, अनिल अंबांनी यांनी २००५मध्ये एचएसबीसीत खाते उघडल्याची माहिती ‘द इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्राच्या हाती लागली आहे. याशिवाय, त्यांची आई कोकिला धीरूभाई अंबांनी यांच्याही नावे एचएसबीसीत खाते असल्याचे समजते.
बर्मन कुटुंबिय ( ७७.५ कोटी) – सन २००६-०७च्या नोंदींनुसार, डाबर समुहाचे मालक असणाऱ्या बर्मन कुटुंबियांच्या नावे एचएसबीसीमध्ये अनेक खाती असल्याचे समजते. डाबर समुहाचे संस्थापक आनंदचंद बर्मन आणि त्यांची पत्नी मिनी बर्मन यांच्या नावे या खात्यांमध्ये तब्बल ८०३, ६८३ डॉलर्स इतकी संपत्ती जमा होती. याशिवाय, समुहाचे संचालक सिद्धार्थ बर्मन आणि त्यांचा मुलगा साकेत यांच्या नावावर एचएसबीसीची तब्बल सात खाती असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, सिद्धार्थ यांचे बंधू प्रदीप यांच्या आठ एचएसबीसीच्या खात्यांमध्ये ६२ लाख डॉलर्सची रक्कम आहे.
यासंबंधी स्पष्टीकरण देताना आनंद बर्मन यांनी मी १९९९ पासून अनिवासी भारतीय असल्याचे सांगितले. हे पैसे विविध योजनांखाली गुंतविण्यात आले असून, त्यासंदर्भात योग्य ते स्पष्टीकरण संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दत्तराज वासुदेव साळगावकर, दिप्ती साळगावकर( ३२ कोटी)- व्ही.एम. साळगावकर समुहाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून दत्तराज साळगावकर यांची ओळख आहे. पोलाद उत्खनन, शिपिंग, आरोग्यसेवा क्षेत्राशी संबंधित क्षेत्रांमध्ये हा समुह कार्यरत आहे. वासुदेव साळगावकर हे मुकेश आणि अनिल अंबांनी यांची बहीण दिप्ती यांच्याशी विवाहबद्ध झाले होते. गोवास्थित साळगावकर कुटुंबियांचा तेथील उद्योगक्षेत्रात प्रचंड दबदबा आहे. साळगावकर कुटुंबातील चारही जणांची एचएसबीसीमध्ये खाती असल्याचे समजते. दत्तराज साळगावकर यांच्या एचएसबीसी बँकेच्या खात्यात शून्य रक्कम जमा असली तरी, त्यांच्या पत्नी दिप्ती साळगावकर यांच्या नावे एचएसबीसीच्या खात्त्यात ५१.७ लाख डॉलर्सची पुंजी जमा आहे. याशिवाय, त्यांची मुले विक्रम आणि ईशिता यांच्याही नावे एचएसबीसीची खाती आहेत.
अनुराग दालमिया ( ५९.६ कोटी)- अनुराग दालमिया हे दालमिया ब्रदर्सचे उपाध्यक्ष आहेत. या समुहाच्या गुजरात हेवी केमिकल्स लिमिटेड (जीएचसीएल) आणि गोल्डन टोबॅको कंपनी( जीटीसी) प्रसिद्ध आहेत. याशिवाय, टेक्सटाईल आणि आरोग्यसेवा क्षेत्रातही दालमिया ब्रदर्स कार्यरत आहेत. अनुराग दालमिया यांनी सन २०००मध्ये एचएसबीसीमध्ये बँक खाते उघडले असून, २००६-०७ साली या खात्यामध्ये ५९.६ कोटींची रक्कम जमा असल्याची नोंद आहे.
मनु छाब्रिया आणि कुटुंबिय ( ८७४ कोटी)- दुबईस्थित मनु छाब्रिया यांची उद्योगक्षेत्रात टेकओव्हर टायकून अशी ओळख आहे. छाब्रिया कुटुंबातील अनेकजणांनी सन २००२मध्ये एचएसबीसी जिनिव्हा येथे बँक खाती उघडल्याची नोंद आहे. यामध्ये त्यांची दिवंगत पत्नी विद्या मनोहर, मुलगी कोमल वझीर यांचा समावेश आहे.
अनु टंडन (३५.८ कोटी) – काँग्रेसच्या माजी खासदार अनु टंडन यापूर्वी रिलायन्स समुहासाठी एक इलेक्ट्रॉनिक फर्म चालवत होत्या. भारतीय महसूली सेवेतील कर्मचारी आणि रिलायन्स समुहाशी संबंधित असलेले संदीप टंडन यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांनी २००५ साली एचएसबीसी बँकेत दोन खाती उघडल्याची कागदपत्रे हाती लागली असून, यामध्ये ३५.८ कोटी इतकी रक्कम जमा असल्याची नोंद आहे. त्यांनी २०१४ साली निवडणूक आयोगाला सादर केलेल्या माहितीतही या खात्यांचा समावेश नव्हता.
एचएसबीसी खातेधारकांमध्ये समावेश असणारी अन्य काही नावे पुढीलप्रमाणे: ( सर्व रक्कम डॉलर्समध्ये)
* उत्तमचंदानी गोपालदास वाधुमल – ५४,५७३,५३५
* मेहता रिहान हर्षद – ५३, ६३१, ७८८
* थरानी महेश ठिकामदास – ४०,६१५,२८८
* गुप्ता श्रवण- ३२,३९८, ७९६
* कोठारी भद्रश्याम हर्षद- ३१,५५५, ८७४
* शौनक जितेंद्र पारेख- ३०,१३७, ६०८
* टंडन संदीप- २६, ८३८, ४८८
* अंबानी मुकेश धीरूभाई- २६,६५४, ९९१
* अंबानी अनिल- २६,६५४,९९१
* कृष्णा भगवान रामचंद – २३, ८५३, ११७
* दोस्त परिमल पाल सिंग – २१, ११०, ३४५
* गोयल नरेश कुमार- १८,७१६, ०१५
* मेहता रविचंद्र वाडीलाल- १८,२५०, २५३
* पटेल कनुभाई आशाभाई- १६, ०५९, १२९
* सचिव राजेश मेहता- १२,३४१, ०७४
* अनुराग दालमिया आणि कुटुंबिय- ९,६०९,३७१
* रविश्चंद्र मेहता बालकृष्ण- ८,७५७,११३
* कुमुदचंद्र शांतीलाल मेहता आणि कुटुंबिय- ८,४५०, ७०३
* पटेल राजेशकुमार गोविंदलाल- ६,९०८,६६१
* हेमंत धीरज- ६,२३७, ९३२
* अनुप मेहता- ५,९७६,९९८
* टंडन अनु- ५,७२८,०४२
* सिद्धार्थ बर्मन- ५,४०१, ५७९
* साळगावकर दिप्ती दत्तराज- ५,१७८,६६८
* डाबरीवाला सुरभित- ५,००,०००