पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जी-२० परिषदस्थळी यूपीआय आणि ई- संजीवनी या राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवेसह भारताच्या प्रमुख डिजिटल सार्वजनिक पायाभूत प्रकल्पांचे दर्शन या विषयावर आधारित प्रदर्शनात घडवण्यात आले आहे.‘भारत मंडपम’मध्ये उभारण्यात आलेल्या ‘डिजिटल इंडिया एक्सपिरियन्स झोन’ला भेट देणारे प्रतिनिधी व इतर पाहुणे यांना आभासी वास्तवाच्या माध्यमातून डिजिटल इंडियाच्या उपक्रमांचा अनुभव घेता येणार आहे. हा विभाग परिषद स्थळावरील ‘प्रमुख आकर्षण’ ठरेल असे सरकारने म्हटले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘भाषिणी’ हा भाषा प्लॅटफॉर्म, आधार, डिजिलॉकर व शिक्षकांच्या अध्यापनासाठी मदत करणारे ‘दीक्षा पोर्टल’ हे येथे पाहायला मिळणार आहेत. याशिवाय भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आभासी प्रत्यक्ष अनुभव विशेषकरून ई-संजीवनी किऑस्कद्वारे घेणे जी-२०च्या प्रतिनिधींना शक्य होणार आहे.

हेही वाचा >>>जी २० परिषदेआधी पंतप्रधांनानी घेतली जो बायडन यांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

अनेक अभिनव प्रदर्शने

जी २० परिषदेच्या बैठकी होणार असलेल्या ‘भारत मंडपम’ मध्ये भारताचे तंत्रज्ञान कौशल्य आणि नवोपक्रम यांच्यासह अनेक प्रदर्शने आयोजित करण्यात आली असून, त्यातून अभ्यागतांना मोठय़ा संख्येत अद्वितीय अनुभव घेता येणार आहेत. ‘कल्चर कॉरिडॉर- जी २० डिजिटल म्युझियम’ मध्ये जी २०ची सदस्य राष्ट्रे आणि आमंत्रित देश यांच्या सामायिक वारशाचे प्रतिनिधित्व दिसून येते, असे सूत्रांनी सांगितले. या प्रदर्शनात सहभागी देश आणि नऊ आमंत्रित देश यांच्या उल्लेखनीय सांस्कृतिक वस्तूंचा अंतर्भाव करण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.

‘डिजिटल इंडिया एक्सपिरियन्स झोन’मध्ये भारतातर्फे राबवण्यात येत असलेल्या तंत्रज्ञानाची शक्ती अनुभवण्याची अभ्यागतांना संधी मिळणार आहे. याशिवाय आस्क गीता, भारतीय रिझव्र्ह बँकेचे ‘आरबीआय इनोव्हेशन पॅव्हिलियन’, ‘यूपीआय वन वल्र्ड’, ‘क्राफ्ट्स बाजार’ यांसह अनेक दालने या प्रदर्शनात आहेत.