पीटीआय, नवी दिल्ली : नौदलाकडून रविवारी ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. नौदलाची अग्रगण्य स्वयंचलित क्षेपणास्त्र प्रक्षेपण करणारी विनाशक युद्धनौका ‘आयएनएस मुरगाव’वरून या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या चाचणीचे ठिकाण कळू शकले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अधिकाऱ्यांनी सांगितले, की ही युद्धनौका व हे शक्तिशाली क्षेपणास्त्र दोन्ही स्वदेशी निर्मिती व आत्मनिर्भरतेचे झळाळणारी बोलकी प्रतिके आहेत. या यशस्वी चाचणीमुळे भारतीय नौदलाच्या सागरातील मारक क्षमतेचे प्रदर्शन केले. या नव्या युद्धनौकेवरून केलेली ब्राह्मोसची पहिलीच चाचणी यशस्वी झाली. अचूक लक्ष्यवेध घेण्यात हे क्षेपणास्त्र यशस्वी ठरले.

ब्राह्मोसबाबत..

भारत आणि रशियाच्या संयुक्त प्रकल्प असलेल्या ‘ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड’तर्फे या क्षेपणास्त्राची निर्मिती केली जाते. ही क्षेपणास्त्रे पाणबुडी, युद्धनौका, विमाने किंवा जमिनीवरूनही प्रक्षेपित करता येतात. ब्राह्मोस ध्वनीच्या वेगापेक्षा जवळपास तिप्पट वेगाने उडते. भारत ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची निर्यातही करत आहे. गेल्या वर्षी जानेवारीत भारताने क्षेपणास्त्राच्या तीन बॅटरी पुरवण्यासाठी फिलीपिन्ससोबत ३७ कोटी पाच लाखांचा करार केला होता.