जगात अत्यंत प्रतिष्ठेचे समजल्या जाणार नोबेल पुरस्करांची विविध क्षेत्रासाठी घोषणा केली जात आहे. आज शुक्रवारी नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा नोबेल समितीने केली. फिलीपीन्स देशाच्या मरिया रेस्सा ( Maria Ressa ) आणि रशियाचे दिमित्री मुराटोव ( Dimitry Muratov ) या दोन पत्रकारांच्या नावांची घोषणा या पुरस्करासाठी करण्यात आली आहे. लोकशाही मधील अविभाज्य घटक असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी नोबेल शांतता पुरस्कार जाहीर केला जात असल्याचे नोबेल समितीने पुरस्कार जाहीर करतांना नमूद केलं आहे. 

मरिया रेस्सा यांनी फिलीपीन्समध्ये २०१२ पासून ऱॅपलर ( Rappler) या डिजीटल मिडिया कंपनीच्या माध्यमातून तिथल्या शासन आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला. खास करुन देशाचे राष्ट्राध्यक्ष ड्युटेरटी यांच्या शासन काळात वादग्रस्त ठरलेली अँटी ड्रग्ज मोहिम आणि त्यामुळे दडपशाही या विरोधात आवाज उठवला. सरकारच्या या मोहिमेत इतकी लोकं ठार मारली गेली की जणू स्वतःच्याच देशातील लोकांविरोधात युद्ध पुकारल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. या मोहिमे विरोधात सातत्याने लिखाण करत मरिया रेस्सा यांनी सत्य चव्हाट्यावर आणलं. 

तर दिमित्री मुराटोव हे रशियातील Novaja Gazeta या वृत्तपत्राच्या संस्थापकांपैकी एक आहेत. हे वृत्तपत्र आत्ताच्या घडीला रशियातील सर्वात स्वतंत्र बाण्याचे, सरकार विरोधात आवाज उठवणारे वर्तमानपत्र म्हणून ओळखले जाते. १९९३ पासून या वृत्तपत्राने भ्रष्ट्राचार, पोलिसांची दडपशाही, बेकायदेशारी अटक, निवडणुकीतील गैरप्रकार याबद्द्ल सातत्याने निर्भिडपणे वृत्तांकन केलं. बदनामी आणि धमक्यांना भिक न घालता दिमित्री मुराटोव यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून काम चालू ठेवले आहे असं पुरस्कराची घोषणा करतांना नोबेल समितीने म्हटलं आहे. 

Story img Loader