राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तिजारा विधानसभा क्षेत्रात सभा घेतली. बाबा बालक नाथ यांचा प्रचार योगी आदित्यनाथ करत आहेत. आपल्या भाषणात त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर आणि त्यांच्या सरकारवर कडाडून टीका केली. राजस्थानची जनता काँग्रेसला धडा शिकवेल असंही त्यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले आहेत योगी आदित्यनाथ?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या भाषणात म्हणाले की, “उदयपूरच्या कन्हय्यालाल प्रकरण हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात राजस्थानचं सरकार अपयशी ठरलं. आमच्या अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्यानेच हे मंदिराची निर्मिती सुरु झाली. आमच्या सरकारमध्ये भव्य राम मंदिर उभारलं जातं आहे. तसंच काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आलं. काँग्रेस सरकारला अयोध्या प्रश्न भिजत ठेवायचा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरमधून ३७० चं कलम हटवून तिथला दहशतवाद संपवला आहे असंही योगी आदित्यनाथ आपल्या भाषणात म्हटलं आहे.

तालिबानचा फक्त एकच उपाय आहे बजरंगबलीची गदा

आपल्या भाषणात योगी आदित्यनाथ म्हणाले, “तालिबानचा फक्त एकच उपाय आहे. बजरंगबलीची गदा. गाझामध्ये इस्रायल ज्याप्रमाणे तालिबानी मानसिकता चिरडण्याचं काम करतो आहे. तशाच पद्धतीने आपणही दहशतवादाविरोधात लढलं पाहिजे. एकदम निवडून अराजकता, गुंडगिरी, दहशतवाद हे संपवले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी समाजासाठी कलंक आहेत. त्या बजरंगबलीच्या गदेनेच संपवल्या पाहिजेत. गुंडगिरी आणि अराजकता यांच्याशी जेव्हा मतांचं राजकारण जोडलं जातं तेव्हा महिला, गरीब, व्यापारी, तसंच सगळा सभ्य समाज त्याच्या विळख्यात सापडतो.” असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

राजस्थानात आज संतांच्या आश्रमांवर बुलडोझर चालवले जात आहेत. या ठिकाणी आया बहिणी सुरक्षित नाहीत. व्यापाऱ्यांची संपत्ती गुंड लुटून नेत आहेत. या सगळ्यातून तुम्हाला सुटायचं असेल बाबा बालकनाथ यांना निवडून द्या. भाजपाचं सरकार आणा म्हणजे या सगळ्या गोष्टी नियंत्रणात येतील असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The only cure for taliban is bajrangbali gada cm yogi adityanath in rajasthan scj
Show comments