एक्स्प्रेस वृत्त, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर दिल्ली पोलिसांनी निसंदिग्ध आरोपनिश्चिती केली आहे. त्यानुसार सहा अग्रगण्य कुस्तिपटूंनी केलेल्या आरोपांबाबत आतापर्यंत केलेल्या तपासानुसार ब्रिजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल करून खटला दाखल करण्याइतके तथ्य या आरोपांत आढळले आहे. लैंगिक छळ, विनयभंग आणि पाठलाग आदीं गुन्ह्यांबाबत त्यांना शिक्षा ठोठावली जाऊ शकते, असे दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रात नमूद केले आहे.

१३ जून रोजीच्या या आरोपपत्रात ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी), ३५४ (महिला विनयभंग); ३५४ अ (लैंगिक छळ) आणि ३५४ ड (पाठलाग) लागू करण्यात आले आहे. एका प्रकरणात ब्रिजभूषण यांनी संबंधिताचा वारंवार छळ केल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. सहापैकी दोन प्रकरणांत ब्रिजभूषण यांच्यावर ‘कलम ३५४, ३५४ अ आणि ३५४ ड’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चार प्रकरणांत ‘कलम ३५४’ आणि ‘३५४ अ’अंतर्गत आहेत. त्यानुसार पाच वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

या आरोपपत्रानुसार दिल्ली पोलिसांनी सिंह आणि साक्षीदारांना समन्स बजावण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. त्यात न्यायालयास उद्देशून नमूद केले आहे, की या प्रकरणी आरोपीवर खटला दाखल करण्यासाठी कृपया समन्स बजावावे. तसेच या आरोपपत्रासह जोडलेल्या साक्षीदारांच्या यादीतील साक्षीदारांना त्यांचा नामोल्लेख असलेल्या कागदपत्रांसह त्यांच्या साक्षीच्या तपासणीसाठी न्यायालयासमोर बोलावले जावे. या आरोपपत्रात असेही नमूद केले आहे, की तपासकर्ते तपासादरम्यान १०८ साक्षीदारांशी बोलले आहेत. यापैकी १५ कुस्तिपटू, प्रशिक्षक आणि पंच आहेत. त्यांनी या सहा कुस्तिपटूंनी केलेल्या आरोपांची पुष्टी केली आहे.

या संदर्भात ब्रिजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया मिळाली नाही. या आरोपपत्रांत असेही नमूद केले आहे, की दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले. या आरोपांचा इन्कार करत त्यांनी असा दावा केला, की ते या कुस्तिपटूंना कधी भेटलेलेही नाहीत. तसेच त्यांचा दूरध्वनी क्रमांकही त्यांच्याकडे नाही.

आरोप करणाऱ्या कुस्तिपटूंनी मात्र आपल्या तक्रारीत नमूद केले आहे, की ब्रिजभूषण यांच्याकडून लैंगिक छळाच्या १५ घटना घडल्या आहेत. त्यापैकी दहा घटनांत आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करणे, धाकदपटशा दाखवणे, धमक्या देणे, अयोग्य पाठलाग करणे असे प्रकार घडले आहेत. या सहा कुस्तिपटूंनी केलेल्या आरोपांना पुष्टी देणारे साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी या आरोपपत्रास जोडलेले आहेत.

चौकशी समिती आणि पोलीस तपासात विरोधाभास

यंदा फेब्रुवारीच्या प्रारंभी कुस्तिपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्याविरुद्ध जाहीर आरोप केले होते. या संदर्भात जागतिक अजिंक्यपद विजेत्या मुष्टियोद्धय़ा मेरी कोम यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या चौकशीदरम्यानही या कुस्तिपटूंनी हे आरोप केले होते. मात्र, एकीकडे ब्रिजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा व्हावी, इतपत गंभीर आरोप असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, दुसरीकडे चौकशी समितीसमोरही हेच आरोप करण्यात आले असताना मात्र, या समितीने याबाबत गंभीर दखल घेऊन पोलीस कारवाईची शिफारस क्रीडा मंत्रालयाला दिलेल्या अहवालात केली नव्हती. कुस्तिपटूंनी हे आरोप प्रथम केल्यानंतर ही समिती २३ जानेवारी रोजी नियुक्त करण्यात आली. फेब्रुवारीत या समितीने संबंधितांची चौकशी केली होती.