राजकीय पक्षांनी त्यांचा निधी बँकांमध्येच भरावा व उमेदवाराला ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे देऊ नयेत तरच पारदर्शकता व उत्तरदायित्वाचे तत्त्व पाळले जाईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. घटनेच्या अनुच्छेद क्रमांक ३२४ अन्वये मार्गदर्शक तत्त्वे पाळणे गरजेचे आहे. राजकीय पक्षाच्या विश्वस्ताने राज्यात व इतर पातळींवरही बँकेत खाते ठेवणे गरजेचे आहे. खाते आयसीएआयच्या नियमानुसार ठेवले गेले पाहिजे. वार्षिक लेखातपासणी झाली पाहिजे, ते सनदी लेखापालाकडून प्रमाणित करून घेतले पाहिजे. कुणालाही २० हजाराच्या वर रक्कम देताना जिथे बँक सुविधा आहे त्या भागात ती धनादेशानेच दिली पाहिजे असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
राजकीय पक्षांनी बँकेत खाते उघडणे अनिवार्य
राजकीय पक्षांनी त्यांचा निधी बँकांमध्येच भरावा व उमेदवाराला ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे देऊ नयेत तरच पारदर्शकता व उत्तरदायित्वाचे तत्त्व पाळले जाईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
First published on: 30-08-2014 at 12:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The political parties must open a bank account