राष्ट्रीयकृत बँकेत सर्व प्रकारचे व्यवहार करण्यासाठी वेळ ठरलेली असते. मात्र, काहीवेळा ग्राहकांना बँकेत मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. बँकेसाठी प्रत्येक ग्राहक महत्त्वाचा असतो. पण बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी दुपारी काही वेळासाठी जेवणाचा ब्रेक असतो. त्या वेळेत ग्राहकांना काही वेळ थांबावं लागतं. आता अशीच एक घटना समोर आली असून एका व्यक्तीने एक्स या सोशल माध्यमांवर एक पोस्ट शेअर करत स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) विरुद्ध संताप व्यक्त केला.
ही व्यक्ती राजस्थानमधील असल्याची माहिती सांगितली जात आहे. या व्यक्तीने एका बँकेच्या शाखेला भेट दिली. मात्र, भेटी दिली तेव्हा त्याला बँकेत एकही कर्मचारी दिसला नाही. यासंदर्भातील त्या व्यक्तीने संताप व्यक्त करत एक्स या सोशल माध्यमांवर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला. त्यानंतर त्या वक्तीच्या पोस्टला एसबीआयने प्रतिसाद देत याबाबतचा खुलासा केला. तसंच त्या व्यक्तीने बँकेतील रिकाम्या खुर्च्यांचा फोटो शेअर केला होता. तो फोटो तात्काळ हटवण्यास सांगितलं.
हेही वाचा : ‘एअर इंडिया’च्या विमानाला ३० तास उशीर; प्रवाशांचे प्रचंड हाल, ‘डीजीसीए’ची कारणे दाखवा नोटीस
नेमकं काय घडलं?
“एका ग्राहकाने ३० मे रोजी एसबीआय शाखेचा एक फोटो घेतला. ज्यामध्ये बँकेतील संपूर्ण कर्मचारी त्यांच्या जेवणासाठी ब्रेक घेतल्याचं दिसत होतं. या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया देत एसबीआयला नेटिझन्सच्या रोषाचा सामना करावा लागला. या ग्राहकाने केलेली पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. या व्यक्तीने पोस्ट शेअर केल्यानंतर नेटिझन्स ही प्रतिक्रिया देत हा एक विनाद असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर या पोस्टला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले. त्यानंतर एसबीआयने आपल्या अधिकृत एक्स हँडलद्वारे झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला. तसेच संबंधित शाखेतील कर्मचाऱ्यांनी जेवणासाठी ब्रेक घेतला होता असं स्पष्टीकरण देत त्या सोशल मीडिया वापरकर्त्याला ते ट्विट हटवण्यास सांगितलं.
We regret the inconvenience caused to you. However, please note that photography/ videography inside branch premises is prohibited due to security reasons. You may be held accountable if these are misused. Therefore, we recommend you to remove these from the social media sites
— State Bank of India (@TheOfficialSBI) May 30, 2024
एसबीआयने काय म्हटलं?
“तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत. तथापि, कृपया लक्षात ठेवा की सुरक्षेच्या कारणास्तव शाखेच्या आवारात फोटोग्राफी/व्हिडिओग्राफी करण्यास मनाई आहे. गैरवापर केल्यास, तुम्हाला जबाबदार धरले जाऊ शकते. त्यामुळे आम्ही तुम्हाला हा फोटो सोशल माध्यमांवरून काढून टाकण्याची शिफारस करतो आहोत.