देशात २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी भाजपा, काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहेत. अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. केजरीवालांच्या पत्रामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसरी आघाडी उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बिगर भाजपा आणि काँग्रेसच्या सरकार बनवण्यासाठी अरविंद केजरीवाल प्रयत्नशील आहेत. पण, अरविंद केजरीवाल यांनी पाठवलेल्या पत्रावर काही मुख्यमंत्र्यांनी उत्सुकता दाखवली नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.
हेही वाचा : “राहुल गांधी माफी मागा नाहीतर..” सत्ताधाऱ्यांचा संसदेत गदारोळ, कामकाज स्थगित
अरविंद केजरीवाल यांनी ५ मार्चला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पी विजयन, तामिळनाडू चे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना पत्र लिहित स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं आहे. तर, तेलंगणाचा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ( केसीआर ) यांनी आरोग्याचं कारण देत बैठकीला येण्यास नकार दिला आहे.
काही दिवसांपूर्वी केसीआर यांनी बिगर भाजपा आणि काँग्रेसचं सरकार बनवण्याची घोषणा केली होती. पण, अन्यही पक्षांनी यात आघाडी घेतल्यावर त्यांनी आरोग्याचं कारण देत जाणं टाळल्याचं सांगितलं जातं. केसीआर सध्या आपला पक्ष भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ) अन्य राज्यात वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा : “भाजपाला राहुल गांधींना हिरो बनवायचंय”, ममता बॅनर्जींचा दावा; म्हणाल्या, “…तर नरेंद्र मोदींविरोधात कुणीच…!”
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंद्योपाध्याय यांनी ‘एनडीटीव्ही’शी बोलताना सांगितलं, “राहुल गांधी विदेशात केलेल्या वक्तव्यांबद्दल माफी मागत नाहीत. त्यामुळे भाजपा संसद चालू देत नाही आहे. याचा अर्थ असा की, काँग्रेसला समोर करत भाजपाला संसद चालू द्यायचं नाही आहे. राहुल गांधी विरोधी पक्षाचा चेहरा बनावा, असं भाजपाला वाटतं. कारण, याचा फायदा भाजपाला होणार आहे.”