लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपला सहकार्य करण्यापासून जाणीवपूर्वक लांब राहिलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महाराष्ट्र, तसेच जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण सक्रिय झाला आहे. महाराष्ट्राची जबाबदारी संघातील अत्यंत वरिष्ठ नेत्याकडे देण्यात आल्याचा दावा संघाशी निगडित सूत्रांनी केला. या घडामोडींमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्व वाढण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने या दोन राज्यांतील भाजपच्या निर्णय प्रक्रियेमध्ये संघाचे वर्चस्व दिसू लागले आहे.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
evm machines scam loksatta news
मारकडवाडी ठरतेय राज्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, सहकार्यवाह अरुण कुमार, भाजपचे संघटना महासचिव बी. एल. संतोष यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात दिल्लीमध्ये बैठक घेतली होती. त्यानंतर संघाकडून मोठ्या हालचालींना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संघाच्या ज्येष्ठ नेत्यांची चर्चा झाली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले जात असल्याची घोषणा प्रदेश भाजपने केली होती.

हेही वाचा >>>Crime News : ट्यूशनवरुन घरी पतरणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, बेशुद्धावस्थेत सापडली मुलगी, कुठे घडली घटना?

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना निवडणूक प्रभारीपदी नियुक्त केल्यामुळे निर्णयप्रक्रियेत प्रदेश भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना दुय्यम स्थान स्वीकारावे लागू शकते अशी चर्चा केली जात होती. मात्र, राज्याच्या निर्णयप्रक्रियेमध्ये संघाने ‘हस्तक्षेप’ केल्यामुळे दिल्लीतून भाजपच्या नेत्यांकडून एकतर्फी निर्णय घेतले न जाता प्रदेश भाजपच्या नेत्यांचेही म्हणणे प्राधान्याने ऐकले जाऊ शकेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. शिवाय, विदर्भातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठीही संघाकडून प्रयत्न केले गेल्याचेही सांगितले जाते.

भाजपकडून प्रत्येक निवडणुकीत संघाकडे औपचारिकरीत्या मदत मागितली जाते. संघ व भाजप यांच्यामधील समन्वयाच्या बैठकीनंतर संघ परिवारातील संस्था व कार्यकर्ते निवडणुकीसाठी  संघटनात्मक कार्यात सक्रिय होतात. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये समन्वयाची एकही बैठक झाली नव्हती. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यातदेखील संघ अलिप्त राहिल्याची चर्चा केली जात होती.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये याची खबरदारी संघाकडून घेतली जात आहे. त्यामुळे भाजपच्या संघटनात्मक निर्णयामध्ये संघ मोठी भूमिका बजावू शकतो. भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या नियुक्तीसंदर्भात संघाने गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीत भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली होती. संघाच्या सूचना भाजपला लागू कराव्या लागत असल्यामुळेच अमित शहांशी बिनसल्यानंतरही राम माधव यांना जम्मू-काश्मीरची जबाबदारी दिली गेल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा >>>Bus Accident : ४० भारतीयांना घेऊन नेपाळला जाणारी बस नदीत कोसळली, मदत आणि बचावकार्य सुरु

राम माधव यांचे महत्त्व कायम

महाराष्ट्राबरोबरच जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचीही सूत्रे संघाने हाती घेतल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सुसंवाद राखण्यात अपयशी ठरलेले राम माधव यांना भाजपला पुन्हा जम्मू-काश्मीरच्या निवडणूक प्रभारीपदी नियुक्त करावे लागले आहे. राम माधव यांची नियुक्ती ही संघाने भाजपला दिलेल्या आदेशाचे निदर्शक असल्याचे मानले जात आहे.

वॉर रुमची जबाबदारी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संघाने कंबर कसली असून राज्यातील भाजपच्या ‘वॉर-रूम’ची जबाबदारी अप्रत्यक्षरीत्या संघाच्या ज्येष्ठ नेत्याच्या हाती देण्यात आली आहे. या नेत्याच्या देखरेखीखाली निवडणुकीसंदर्भातील अंतिम निर्णय घेतले जाऊ शकतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Story img Loader