Lata Mangeshkar Passes Away : भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झाल्याने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे असून, दोन दिवसांसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा आजचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. शिवाय, भाजपाच्यावतीने गानकोकिळा लता मंगेशकर यांनी श्रद्धांजली देखील अर्पण केली करण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून आज जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार होता. यासाठी विशेष कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते आणि त्यासाठी लखनऊमध्ये भाजपाचे दिग्गज नेते मंडळी उपस्थित झाले होते. मात्र भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाल्याची बातमी आल्यानंतर, या कार्यक्रमाच्या ठिकाणी लता मंगेशकर यांना भाजपाकडून दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी व्यासपीठावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि भाजापा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.
Lata Mangeshkar Passes Away Live : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन
पक्षाकडून सांगण्यात आले की, नंतर उत्तर प्रदेशसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या तारखेची घोषणा केली जाईल. पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणुक १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी सांगितले की, लता मंगेशकर यांच्या निधनामुळे आम्ही ‘लोक कल्याण संकल्प पत्र'(जाहीरनामा) जाहीर करण्यास स्थगिती देत आहोत. आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची पुढील तारीख नंतर जाहीर करू.
Lata Mangeshkar Passes Away : लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार
याशिवाय भाजाने आपले काही राजकीय कार्यक्रम देखील रद्द केले आहेत. ज्यामध्ये गोव्यात होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हर्चुअल रॅलीचा देखील समावेश आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एएनआय वृत्तसंस्थेला याबाबत माहिती देताना सांगितले की, गोवा भाजाने लता मंगेशकर यांच्या निधनामुळे पंतप्रधानांची रॅली आणि पार्टीचे अन्य प्रमुख कार्यक्रम रद्द केले आहेत.