कडकनाथ कोंबडी या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. आता करोनाची लागण आणि त्यानंतर बरे झाल्यानंतर आहारात कडकनाथ कोंबडीचा वापर केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते, असा दावा मध्य प्रदेशातील झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटर आणि कृषि विज्ञान केंद्राने केला आहे. यासाठी इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्चला एक पत्र पाठवण्यात आलं आहे. यात कडकनाथ कोंबड्यांच्या मांसातून प्रोटीन, विटामिन, झिंक आणि लो फॅट मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच कोलेस्ट्रॉल फ्री असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे करोना झाल्यानंतर आणि त्यातून बरे झाल्यानंतर आहारात कडकनाथ कोंबडीचा वापर करायला हवं असं सांगण्यात आलं आहे. या पत्रावर नॅशनल मीट रिसर्च सेंटर आणि मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आलेला अहवालच्या प्रतीही जोडण्यात आल्या आहेत. ट्विटरवरही सूचना पत्र दिलं गेलं आहे. त्याचबरोबर दोन्ही संस्थांना पत्र आणि अन्य दस्ताऐवज पाठवण्यात आले आहेत. कडकनाथ कोंबडीच्या अंड्यांमधूनही प्रोटीन मिळत असल्याच्या दाव्यावर जोर देण्यात आला आहे.

आता आयसीएमआर यावर काय निर्णय देतं याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे. आयसीएमआरनं अजूनपर्यंत यावर कोणतही परीक्षण केलेलं नाही. त्यामुळे कडकनाथ कोंबड्यांचा आहारात समावेश करायचा की नाही?, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

Tandoori chicken
Tandoori Chicken: तंदुरी चिकन कसं ठरलं जगातलं सर्वोत्तम ग्रिल्ड चिकन?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Chicken tikka easy version recipe chicken starter easy recipe
Chicken Tikka Recipe: नॉन व्हेजचा बेत आखताय? मग अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘चिकन टिक्का’, झटपट होईल रेसिपी तयार
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
Fight between dog and cock people surprise after result dog scared from this bird watch viral video
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” एवढ्याशा कोंबड्यानं कुत्र्याची काय अवस्था केली पाहाच
what is the reason that Sea fish became expensive
मासे परवडत नाहीत, मत्स्याहारींनी करायचे तरी काय?
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO

दुसरीकडे कडकनाथ कोंबड्यांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॅट नसल्याचा दावा करण्यात आला आहे. हैदराबाद नॅशनल मीट रिसर्च लॅबोरेटरीने याची पुष्टी केली आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी कडकनाथ कोंबड्यांचं मांस योग्य असल्याचा आंतराष्ट्रीय अहवाल प्रकाशित झाला आहे. त्यामुळे करोना रुग्णांच्या आहारात कडकनाथ कोंबड्यांचा समावेश करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Kappa Variant : उत्तर प्रदेशमध्ये Delta नंतर सापडले कप्पा विषाणूचे रुग्ण!

करोना रुग्णांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी होत असल्यांचं दिसून आलं आहे. त्यासाठी हाय प्रोटीन आहार महत्त्वाचा असल्याचं बोललं जातं. त्यामुळे कडकनाथ कोंबडी त्याला योग्य पर्याय ठरेल असं सांगण्यात येत आहे. आता आयसीएमआर झाबुआच्या कडकनाथ रिसर्च सेंटर्सच्या सूचनेवर काय अंमलबजावणी करते?, याकडे लक्ष लागून आहे.